भारत आणि श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ३ गडी राखून विजय मिळवला होता. श्रीलंकेच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत भारतीय फलंदाजांसमोर २७६ धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय संघाचे ७ गडी १९३ धावांवर माघारी परतले होते. परंतु शेवटी दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार यांच्या खेळीमुळे भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवला होता. या विजयानंतर श्रीलंकन कर्णधार दसून शनाका आणि प्रशिक्षक मिकी आर्थर यांच्यात जबरदस्त वाद झाल्याचे पहायला मिळाले होते. याबाबत आता श्रीलंकन कर्णधाराने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय श्रीलंका संघाला पराभूत होताना पाहून प्रशिक्षक निराश झाले होते. जेव्हा दीपक चाहरने चौकार मारत हा सामना भारतीय संघाला जिंकून दिला. त्यानंतर प्रशिक्षक मिकी आर्थर आणि कर्णधार दसून शनाका यांच्यात वाद झाल्याचे पहायला मिळाले होते. (Dasun shanaka throws light on spat with head coach micky arthur)
मिकी आर्थरसोबत झालेल्या वादावर काय म्हणाला दसून शनाका
दसून शनाकाने याबाबत पत्रकार परिषदेत म्हटले की, “ही एक अशी गोष्ट आहे की, ड्रेसिंग रूममध्ये घडायला हवी होती. त्यांनी मला विचारले की मी रणनीतीपेक्षा काहीतरी वेगळे केले आहे का? ज्यावर मी नाही असे म्हटले होते. मी त्यांना सांगितले की, मी योजनेत बदल केला नव्हता. आमच्यात एवढेच बोलणे झाले होते. इतर कोणताही वाद झाला नाही.”
मिकी आर्थर आणि दसून शनाका यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या होत्या. माजी श्रीलंकन क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन यांनी मिकी आर्थरवर टीका करत म्हटले होते की, “त्यांनी शांत राहायला हवं होतं.”
दुसऱ्या वनडे सामन्यात भुवी-चाहरची विजयी भागीदारी
दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंका संघाने भारतीय संघासमोर २७६ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघातील गोलंदाजांनी भारतीय संघातील मुख्य फलंदाजांना लवकर माघारी धाडले होते. असे वाटू लागले होते की, श्रीलंका संघ या सामन्यात एकहाती विजय मिळवणार. परंतु शेवटी दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार यांच्या जोडीने नाबाद ८४ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला सामना जिंकून दिला. यामध्ये दीपक चाहरने ६९ धावांचे योगदान दिले तर, भुवनेश्वर कुमारने १९ धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
विरोधी संघातून कोहली अन् शास्त्रींना मोठा सल्ला, पंतबाबत सांगितली ‘ही’ महत्त्वपुर्ण गोष्ट
Video: नाणेफेक जिंकल्यानंतर उरला नाही ‘गब्बर’च्या आनंदाला पारावार, केले भन्नाट सेलिब्रेशन
रैनाच्या मी ब्राह्मणच्या कमेंटनंतर जडेजाच्या ‘त्या’ प्रतिक्रियेने उडाली खळबळ, झाला भरपूर ट्रोल