---Advertisement---

Video: नाणेफेक जिंकल्यानंतर उरला नाही ‘गब्बर’च्या आनंदाला पारावार, केले भन्नाट सेलिब्रेशन

On: शुक्रवार, जुलै 23, 2021 4:42 PM
---Advertisement---

कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका विरुद्ध भारत संघात शुक्रवारी (२३ जुलै) वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. या सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात तब्बल ६ बदल करण्यात आले. भारताकडून ५ खेळाडू वनडे पदार्पण करत आहेत. त्याच वेळी नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार शिखर धवनने खास शैलीत आनंद साजरा केला.

नाणेफेकीनंतर शिखरचे सेलिब्रेशन
मालिकेतील अखेरच्या वनडे सामन्यात शिखर धवन भारतीय कर्णधार म्हणून मैदानात उतरला. पहिल्या दोन सामन्यात धवनला नाणेफेक जिंकल्यास अपयश आले होते. कारकिर्दीत प्रथमच नेतृत्व करत असलेल्या धवनला नाणेफेक जिंकल्यानंतर आनंद झाला. त्यानंतर, त्याने आपल्या नेहमीच्या अंदाजात ‘थाय फाय’ सेलिब्रेशन केले. क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या कर्णधाराने नाणेफेक जिंकल्यानंतर जल्लोष करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.

धवन ठरला अपयशी
मालिकेतील पहिल्या सामन्यात ८६ धावांची खेळी करणाऱ्या धवनला या सामन्यात अपयश आले. सलामीला उतरल्यानंतर त्याने तीन चौकार मारत चांगली सुरुवात केली. मात्र, दुष्मंता चमिराच्या एका उसळी घेणाऱ्या चेंडूवर तो फसला आणि यष्टीरक्षक मिनोद भानुकाच्या हाती झेल देत माघारी परतला. त्याने ११ चेंडूत १३ धावा केल्या.

भारतीय संघात सहा बदल
आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघात सहा बदल केले गेले. यष्टीरक्षक संजू सॅमसन, फलंदाज नितीश राणा, लेगस्पिनर राहुल चाहर, अष्टपैलू कृष्णप्पा गौतम व डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया यांनी वनडे पदार्पण केले. वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यानेदेखील बऱ्याच कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन केले. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. त्यानंतर उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका सुरू होईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

तब्बल चार दशकांनंतर एकाच वनडे सामन्यात ५ भारतीयांनी केले वनडे पदार्पण, पहिल्यांदा ‘या’ दिग्गजांना मिळालेला मान

पंजाब किंग्जचा ‘हा’ क्रिकेटर चढला बोहल्यावर, ८ वर्षे जुन्या मैत्रिणीला बनवले जीवनसंगिनी

पार्थिव पटेलचे महत्त्वपूर्ण विधान, “धोनीमुळे माझी कारकीर्द…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---