श्रीलंका विरुद्ध भारत संघात शुक्रवारी (२३ जुलै) वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळला जात आहे. कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. या सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात तब्बल ६ बदल करण्यात आले. भारताकडून ५ खेळाडू वनडे पदार्पण करत आहेत. तसेच या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज नवदीप सैनीलाही अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळाली.
चाळीस वर्षांनंतर भारतीय क्रिकेटमध्ये घडली अशी घटना
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने या मालिकेत आधीच विजयी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे मालिकेतील अखेरच्या सामन्यात बाकावरील इतर खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचाच भाग म्हणून भारतीय संघात तब्बल ६ बदल केले गेले. त्यापैकी पाच खेळाडू हे आपले वनडे पदार्पण करत होते. अशा प्रकारे भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात पहिल्या वनडे सामन्यानंतर एकाचवेळी पाच क्रिकेटपटूंनी वनडे पदार्पण करण्याची ही केवळ दुसरी घटना घडली.
भारताने सर्वात पहिला वनडे सामना खेळल्यानंतर भारतीय क्रिकेट इतिहासात एकाच वनडे सामन्यात पाच खेळाडूंनी पदार्पण करण्याची पहिली घटना ६ डिसेंबर १९८० रोजी मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर घडलेली. त्यावेळी भारतीय संघासाठी संदीप पाटील, रॉजर बिन्नी, किर्ती आझाद, तिरुमल्ला श्रीनिवासन व दिलीप दोशी यांनी वनडे पदार्पण केलेले. त्यानंतर तब्बल चाळीस वर्षानंतर अशी घटना घडली.
शुक्रवारच्या सामन्यामध्ये केरळ क्रिकेट संघाचा कर्णधार संजू सॅमसन, दिल्लीचा अनुभवी फलंदाज नितीश राणा, राजस्थानचा युवा लेगस्पिनर राहुल चाहर, कर्नाटकचा अष्टपैलू कृष्णप्पा गौतम व सौराष्ट्राचा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया यांनी वनडे पदार्पण केले. त्यापैकी गौतम, सकारिया व राणा यांचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पण देखील आहे. या पाच जणांसह भारतीय संघासाठी आत्तापर्यंत २४१ क्रिकेटपटू वनडे सामने खेळले.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाब किंग्जचा ‘हा’ क्रिकेटर चढला बोहल्यावर, ८ वर्षे जुन्या मैत्रिणीला बनवले जीवनसंगिनी
पार्थिव पटेलचे महत्त्वपूर्ण विधान, “धोनीमुळे माझी कारकीर्द…”
अय्योव! चक्क घोड्यावर स्वार होऊन नाणेफेकीसाठी पोहोचला कर्णधार, लोकांचा सेल्फीसाठी गदारोळ






