---Advertisement---

रैनाच्या मी ब्राह्मणच्या कमेंटनंतर जडेजाच्या ‘त्या’ प्रतिक्रियेने उडाली खळबळ, झाला भरपूर ट्रोल

On: शुक्रवार, जुलै 23, 2021 4:41 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माझी क्रिकेटपटू सुरेश रैनाने तामिळनाडू प्रीमियर लीग दरम्यान समालोचन करताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. समालोचन करताना म्हणाला होता की, तो एक ब्राह्मण आहे आणि यामुळेच त्याला चेन्नईची संस्कृती आत्मसात करण्यासाठी जास्त अडचणी आल्या नाहीत. यावरूनच सोशल मीडियावर रैनावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. इतकेच नव्हे तर आता यामध्ये रैनानंतर चेन्नई सुपर किंग्स संघातील त्याचा साथीदार रवींद्र जडेजाचेही नाव यात ओढावले गेले आहे. त्यानंतर रविंद्र जडेजाची देखील सोशल मीडियावर हजेरी घेतली.

जडेजाने नुकतेच हे ट्विट केले आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘सदैव राजपूत मुलगा (राजपूत बॉय), जय हिंद.’ जडेजाने केलेले हे ट्विट चाहत्यांना अजिबात आवडलेले नाही.

जडेजाच्या या ट्विटला प्रत्युत्तर देताना चाहत्यांनी कमेंट्समध्ये लिहिले की, ‘जडेजाकडून अशा ट्विटची अपेक्षा नव्हती. अशा पद्धतीने खेळामध्ये जातीवाद निर्माण करणे पूर्णपणे चुकीचे आहे.’

https://twitter.com/HPS_Rathore/status/1418268880200376320?s=20

जडेजा सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेलेला आहे. 4 ऑगस्टपासून भारताला इंग्लंड संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. कसोटी मालिकेपूर्वी भारत आणि काउंटी सिलेक्ट इलेव्हन यांच्यात तीन दिवसीय सराव सामना खेळला गेला. हा सराव सामना अनिर्णित राहिला. परंतु रवींद्र जडेजाने या सामन्यात फलंदाजी शानदार प्रदर्शन केले. जडेजाने दोन्ही डावात अनुक्रमे 75 आणि 51 धावा केल्या.

तर सुरेश रैनाने मागीलवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही वेळातच रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे आता धोनी आणि रैना आपल्याला आयपीएल सामन्यांदरम्यान मैदानावर खेळताना दिसतात. आयपीएल 2021 चे उर्वरित सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात घेण्याचे निश्चित केले गेले आहे. त्याचबरोबर हे सामने यूएईमध्ये होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पंजाब किंग्जचा ‘हा’ क्रिकेटर चढला बोहल्यावर, ८ वर्षे जुन्या मैत्रिणीला बनवले जीवनसंगिनी

पार्थिव पटेलचे महत्त्वपूर्ण विधान, “धोनीमुळे माझी कारकीर्द…”

अय्योव! चक्क घोड्यावर स्वार होऊन नाणेफेकीसाठी पोहोचला कर्णधार, लोकांचा सेल्फीसाठी गदारोळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---