इंग्लंड विरुद्ध भारत संघात ५ फेब्रुवारीपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिले २ सामने चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहेत. तर शेवटचे दोन सामने अहमदाबादमधील नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमवर होणार आहेत. या मालिकेआधी अनेक दिग्गजांनी विविध अंदाज बांधले आहेत. आता यात इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि दिग्गज समालोचक डेविड लॉयड यांनी देखील उडी घेतली आहे.
डेली मेलला नासिर हुसेन आणि पॉल न्यूमनसह लिहिलेल्या स्तंभात त्यांनी म्हटले आहे की भारत सर्वोत्तम संघ आहे आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये पराभूत करुन हे सिद्ध केले आहे.
त्यांनी लिहिले, ‘भारतीय संघ प्रमुख दावेदार असले तरी इंग्लंड संघ अंडरडॉग असणे चांगले आहे. त्यांना श्रीलंकेत दोन सामने खेळण्याचा फायदा होईल, कारण येथील (भारतातील) वातावरण साधारण सारखे आहे. माझ्या मतानुसार भारतीय संघ मुख्य दावेदार असतील.’
तसेच त्यांनी म्हटले की ‘भारतीय संघ सध्या जगात सर्वोत्तम आहेत आणि त्यांनी त्यांच्या नियमित कर्णधाराशिवाय ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन, हे दाखवून दिले आहे. त्यांच्याकडे समतोल संघ आहे आणि चांगले फलंदाज आहेत. नासिर म्हणत आहेत की ते रविंद्र जडेजाला मिस करतील, पण अक्षर पटेल खुुप चांगला गोलंदाज आहे.’
त्याचबरोबर लॉयड यांनी म्हटले आहे की इंग्लंडच्या गोलंदाजांना विराट कोहलीला रोखावे लागणार आहे. तसेच त्यांनी मालिकेबद्दल अंदाज व्यक्त करताना म्हटले आहे की ‘मला वाटते भारत जिंकले, कदाचित ३-० किंवा ४-० फरकाने, पण मला माझा अंदाज खोटा ठरलेला आवडेल.’
या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तो या मालिकेतून कसोटी पदार्पण करु शकतो. याशिवाय भारतीय संघात विराट कोहलीसह हार्दिक पंड्या, इशांत शर्माचेही पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघातही जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, रॉरी बर्न्स अशा खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे.
सध्या दोन्ही संघांमध्ये आत्मविश्वास आहे. कारण या मालिकेपूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायदेशात कसोटी मालिकेत पराभूत करुन परतला आहे. तर इंग्लंडच्या संघाने श्रीलंकेला श्रीलंकेत पराभूत केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“ऑस्ट्रेलियन भूमीवरील भारताचा विजय अतुलनीय!” पाहा कोणी केलंय कौतुक
इंग्लिश गोलंदाजांचा सामना करण्यासाठी किंग कोहलीची जय्यत तयारी, पाहा व्हिडिओ