वेस्ट इंडिजनंतर टी20 फॉरमॅटमध्ये कोणत्याही देशाच्या खेळाडूंचे वर्चस्व असेल तर ते दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आहेत. यामध्ये डेव्हिड मिलरचे सर्वात मोठे नाव आहे. डेव्हिड मिलरमध्ये कोणत्याही परिस्थितीत संघाला स्वबळावर विजयापर्यंत नेण्याची क्षमता आहे आणि मिलरने हे अनेकदा दाखवून दिले आहे. याचाच उदाहरण 10 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहायला मिळाला. ज्यामध्ये मिलरने केवळ 40 चेंडूत 82 धावा केल्या. या सामन्यात मोठी कामगिरी करण्यापासून मिलर थोडा दूर राहिला असला तरी आता मालिकेतील पुढील 2 सामन्यांमध्ये त्याला अशी कामगिरी करण्याची संधी आहे.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकचे नाव सध्या अव्वल स्थानावर आहे. ज्याने 92 सामन्यांमध्ये 31.51 च्या सरासरीने 2584 धावा केल्या आहेत. डेव्हिड मिलरबद्दल बोलायचे झाले तर त्याने 127 सामन्यात 33.55 च्या सरासरीने 2550 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत डेव्हिड मिलरने पाकिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतील उर्वरित 2 सामन्यांमध्ये आणखी 35 धावा केल्या तर तो क्विंटन डी कॉकला मागे टाकून आफ्रिकेसाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरेल. मिलरच्या नावावर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 शतके आणि 8 अर्धशतके आहेत. तर त्याचा स्ट्राइक रेट 141.19 आहे.
डेव्हिड मिलरची देखील आयपीएलमधील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणना केली जाते. ज्यामध्ये तो बराच काळ पंजाब किंग्ज संघाचा भाग होता. याशिवाय गेल्या आयपीएल हंगामात गुजरात टायटन्स संघाकडून खेळलेला मिलर पुढील वर्षीच्या मोसमात लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. यावेळी, मेगा लिलावापूर्वी गुजरात टायटन्स संघाने त्याला कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा-
ICC Women ODI Rankings; दक्षिण आफ्रिकेची ही खेळाडू अव्वलस्थानी, टाॅप 10 मध्ये एकच भारतीय
विराट-रोहित नाही, तर हार्दिक पांड्या या वर्षातील सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू, कुस्तीपटू विनेश फोगट अव्वलस्थानी
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन; बी.ए.आर.सी. व्यावसायिक गटाच्या उपांत्य फेरीत