दक्षिण आफ्रिका संघातील काही खेळाडू २०२२च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळले आहेत. याचाच फायदा त्यांना भारत विरुद्धच्या टी२० मालिकेत झाला आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर असून ते पाच सामन्यांची टी२० मालिका खेळत आहेत. यातील दिल्ली येथे झालेल्या पहिल्या सामन्यात त्यांनी ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. यामध्ये आयपीएलच्या गुजरात टायटन्स संघाकडून खेळणाऱ्या डेविड मिलरने स्फोटक फलंदाजी केली आहे.
या सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मिलरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. यावेळी त्याने मी कुठेही फलंदाजी करायला नेहमीच तयार आहे,” असे म्हटले आहे.
“मागील काही वर्षापासून मी माझ्या खेेेळात सुधारणा करण्यात खूप मेहनत घेतली आहे. एका सामन्यामध्ये महत्वाची भुमिका पार पाडण्यासाठी दोन खेळाडूंची आवश्यकता असते. भारताविरुद्धच्या सामन्यात रस्सीने विकेट्स पडल्यावर चांगली साथ दिली,” असे मिलर (David Miller) म्हणाला.
“माझा स्वत:वर विश्वास होता, यामुळेच कामगिरीमध्ये सुधारणा झाली आहे. अधिक सामने जिंकणे आणि सातत्याने उत्तम कामगिरी करण्यावर माझा भर आहे. मी कुठेही आणि कोणत्याही क्र्मांकावर फलंदाजी करायला तयार आहे. मला फक्त काहीतरी वेगळे करण्याची इच्छा आहे,” असेही मिलरने पुढे म्हटले आहे.
हा सामना अरूण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. यावेळी भारतीय संघाने २० षटकात ४ विकेट्स गमावत २११ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या संघाची अडखळतच सुरूवात झाली. पहिले तीन फलंदाज झटपट बाद झाले असता, मिलर आणि रस्सी वॅन डर दुसेन यांनी मोर्चा सांभाळला.
मिलर-दुसेन या जोडीने चौथ्या विकेटसाठी नाबाद १३१ धावांची भागीदारी केली आहे. यामध्ये मिलरने २००पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने ३१ चेंडूत ६४ धावा केल्या आहेत. तर, दुसेनने ४६ चेंडूत ७५ धावा केल्या आहेत. दोघांनी या सामन्यात प्रत्येकी ५-५ षटकार फटकारले आहेत.
या मालिकेत रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पुढच्या सामन्यात गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) दुसरा टी२० सामना बाराबाती स्टेडियम, कटक येथे १२ जूनला खेळला जाणार आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvsSA | विराट कोहलीनंतर रिषभ पंतने केलं ‘हे’ नकोसं काम, संघाच्या अपेक्षांवर फेरले पाणी
चर्चाच एवढी रंगलीय की, उमरान ‘रॉकेट’ मलिकच्या स्पीडनं लोकं वेडी व्हायची राहिलीत
भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात रचला गेला वर्ल्डरेकॉर्ड; दोघांच्या ७ खेळाडूंनी केली ‘ही’ भन्नाट कामगिरी