दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीतील फलंदाज डेव्हिड मिलर हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. त्याने आयपीएलमध्येही खेळताना काही अविस्मरणीय खेळी केल्या आहेत.
नुकतेच त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ऍडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी मिळणे ही त्याच्यासाठी एक स्वप्नपूर्णतेचा क्षण होता, असे सांगितले आहे. गिलख्रिस्ट आणि मिलर २०११ ते २०१३ पर्यंत किंग्स इलेव्हन पंजाब संघात एकत्र होते.
मिलरने पॉमी एमबाग्वाबरोबर इंस्टाग्राम लाईव्ह व्हिडिओ चॅटमध्ये बोलताना सांगितले की ‘त्यावेळी ऍडम गिलख्रिस्ट कर्णधार होता. मी मोठा होत असताना नेहमीच गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडनला आदर्श म्हणून पाहिले. मी पहाटे ३ वाजता उठून पण ऑस्ट्रेलियाचे सामने पहायचो. गिलख्रिस्ट माझा कर्णधार होता. आमच्या संघात काही दिग्गज होते. त्यामुळे माझ्यासाठी ते सर्व स्वप्नवत होते.’
मिलर त्याच्या आयपीएलच्या अनुभवाबद्दल पुढे म्हणाला, ‘माझ्या पहिल्या वर्षी मला आयपीएलमध्ये एक सामनाही खेळायला मिळाला नाही. दुसऱ्यावर्षाच्या मधे मला ३ सामने मिळाले.(२०१२ ला मिलर ६ आयपीएल सामने खेळला होता.) त्यानंतर तिसऱ्या वर्षी गिलख्रिस्ट निवृत्त होणार होता, त्याच्या हॅमस्ट्रिंगला ताण आला होता. मला संधी मिळाली. तेव्हाच मी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध नाबाद १०१ धावांची खेळी केली होती.’
याबरोबरच मिलरने त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी कशी मिळाली याबद्दलही खुलासा केला. तो म्हणाला, ‘पहिल्या वर्षी मी लिलावासाठी गेलो, पण मला कोणी घेतले नाही. मात्र स्टुअर्ट ब्रॉडला दुखापत झाल्याने आयपीएलच्या १० दिवस आधी मला किंग्स इलेव्हन पंजाबकडून कॉल आला. ते मला म्हणाले, आम्ही तूला निवडले आहे आणि तू जेवढे शक्य होईल तेवढे लवकर ये. त्यामुळे मी माझ्या बॅग्स पॅक केल्या आणि भारतात आलो.’
‘अशी माझी सुरुवात झाली. हा खूप मस्त प्रवास होता. पहिल्यांदा हा केवळ १ वर्षाचा करार होता. पण नंतर त्यांनी माझ्या मुळ किमतीत मला पुढील दोन वर्षासाठी कायम केले. आयपीएलमधील पहिले ३ वर्षे माझ्यासाठी मस्त होते.’
मिलरने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ७९ सामने खेळले असून यात त्याने ३४.२५ च्या सरासरीने १८५० धावा केल्या असून १ शतक केले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
जर केविन पीटरसनचे ‘ते’ म्हणणे खरे ठरले, तर धोनी खेळू शकतो विश्वचषक
लॉकडाऊन इफेक्ट: भारतीय खेळाडूवर आली उपासमारीची वेळ, गावातील लोकांकडे मागावी लागतेय मदत
सील बाॅर्डर क्राॅस करुन भाजप खासदार क्रिकेट खेळण्यासाठी हरियाणात