fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

लॉकडाऊन इफेक्ट: भारतीय खेळाडूवर आली उपासमारीची वेळ, गावातील लोकांकडे मागावी लागतेय मदत

World cup camp Footballer Sudha Ankita Tirkey fight with hunger during Lockdown

कोविड-१९ या जागतिक महामारीमुळे जगातील अनेक देशांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशात १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल संघामध्ये सामाविष्ट केल्या जाणाऱ्या एका संभाव्य महिला फुटबॉलपटूच्या कुटुंबालाही याचा सामना करावा लागत आहे. झारखंडच्या गुमला या शहरातील दानपुर गावात राहणारी सुधा अंकिता तिर्की हिच्या कुटुंबाला लॉकडाऊनमुळे २ वेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे.

परिस्थिती अशी झाली आहे की, पोट भरण्यासाठी सुधाच्या कुटुंबाला गावातील लोकांकडे मदत मागावी लागत आहे. अशात मदतीतून मिळणाऱ्या तांदूळ आणि डाळीपासून ती तिच्या आई आणि छोट्या बहिणीचे पोट भरत आहे. world cup camp Footballer Sudha Ankita Tirkey fight with hunger during Lockdown

फेब्रुवारी २०२१मध्ये भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील फीफा महिला विश्वचषक फुटबॉल संघाच्या भारतीय कॅम्पमध्ये सुधाची निवड झाली आहे. ती नुकतीच आपल्या संघाकडून टर्कीमधील सराव सामना खेळून आली होती. प्रशिक्षक आणि फुटबॉल संघाच्या माहितीदारांनुसार सुधा संघातील १८ खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याइतकी प्रबळ खेळाडू आहे. तिला आता संतुलित आहार घेण्याची आवश्यकता असताना, तिच्यावर डाळ-भात खाण्याची वेळ आलेली आहे.

२०१९मध्ये कोल्हापुर येथे झालेल्या ज्यूनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशीप दरम्यान सुधाची भारतीय फुटबॉल संघात निवड झाली होती. यावर फुटबॉल संघाचे सचिव सागर उरांव यांनी म्हटले आहे की, “आम्हाला यासंदर्भात काहीही माहिती मिळाली नव्हती. तिला लवकरात लवकर मदत करण्यात येईल.”

सुधाची आई ललिता या दुसऱ्यांच्या घरी काम करुन आपल्या दोन्ही मुलींचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सध्या उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे त्यांचे काम बंद पडले आहे.

ललिता तिर्की म्हणाल्या की, “काही दिवसांपुर्वी रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज भरला होता. १ एप्रिलनंतर १० किलो तांदूळ मिळाले होते. परंतु, या महिन्यात सांगण्यात आले की रेशन मिळणार नाही. त्यामुळे काही दिवसांपुर्वी मदतीसाठी सुधा २ तासांचा प्रवास करुन मामाच्या गावी खोडहा येथे गेली होती. पण, मामाकडेही अशीच परिस्थिती आहे. त्याने थोडे बटाटे आणि कांदे देऊन तिला परत पाठवून दिले.”

सुधा तिर्कीचे कुटुंब अगोदर चितरपुरच्या खोडहा या गावी राहत होते. मात्र, तिच्या वडिलांच्या निधनानंतर गावकऱ्यांनी त्यांना खूप त्रास दिला. म्हणून ललिता या त्यांच्या दोन्ही मुलिंना घेऊन दानपुर येथे राहायला आल्या. त्या गावातील मिशनरी शाळेतील फादरच्या घरी काम करत असत. त्या फादरनी त्यांच्या छोट्या मुलीला शिक्षणासाठी बरीच मदत केली आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

पब्जी खेळणाऱ्यांसाठी खुशखबर! घरबसल्या जिंकू शकतात १ कोटी रुपये

या गोष्टीमुळे ट्रोल होतेय भारतीय महिला, गेल्यावर्षी केले होते…

हसीन जहाँने डांन्स करत दिल्या ईदच्या शुभेच्छा, तर मोहम्मद शमी केला खास…

You might also like