fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पब्जी खेळणाऱ्यांसाठी खुशखबर! घरबसल्या जिंकू शकतात १ कोटी रुपये

PUBG Players Can Won 1 crore Rupees By Playing PUBG Tournament

खेळ म्हणजे एक स्पर्धात्मक क्रिया जी अनेक नियमांनी बनलेली असते. असाच एक खेळ आहे पब्जी (PUBG). यामध्ये १०० खेळाडू पॅराशूटद्वारे एका बेटावर उतरतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे हत्यार शोधत स्वत:ला वाचवून दुसऱ्याला मारत असतात.

एका सुरक्षित जागेत त्यांना हा खेळ खेळायचा असतो. ही जागा सुुरुवातीला थोडी मोठी असते. परंतु, हळूहळू ती छोटी होत जाते. जेणेकरुन जिवंत खेळाडू एकमेकांच्या समोर येऊ शकतात. जो खेळाडू किंवा संघ शेवटपर्यंत टिकून राहतो तो जिंकतो.PUBG Players Can Won 1 crore Rupees By Playing PUBG Tournament

पब्जी खेळाला ज्याप्रकारे भारतात खेळले जाते, त्यानुसार पब्जीचे टूर्नामेंट आयोजित केले जातात. यात भाग घेणारा खेळाडू जिंकल्यास त्याला १ कोटी रुपयांचे बक्षीस मिळू शकते. पब्जीने मागच्या वर्षीही असे टूर्नामेंट आयोजित केले होते. परंतु, ते फक्त महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यापिठातील विद्यार्थ्यांसाठी होते. मात्र, यावेळी हे टूर्नामेंट कोणीही खेळू शकते. फक्त त्यासाठी तुम्हाला पब्जी मोबाईल इंडिया सीरीजच्या (PUBG Mobile India Series) पेजवर जाऊन नोंदणी करावी लागते.

विशेष म्हणजे, यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. टूर्नामेंटमध्ये खेळाडूंना अंतिम सामना खेळण्यापुर्वी २ पात्रता फेरी (क्वालिफाइंग राउंड) खेळाव्या लागतील. टूर्नामेंटमधील सर्व गेम्स आशिया सर्वर रीजनमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

धोनीला बिर्याणी खाऊ न घातल्याने ‘या’ खेळाडूने गमावले…

टीम इंडियातील ‘हा’ खेळाडू होऊ शकतो भविष्यात चांगला समालोचक

२०१५ साली शेवटचा सामना खेळलेला खेळाडू म्हणतोय, धोनीच्या जागी मला द्या संधी

You might also like