मुंबई । भारताविरुद्धची मालिका झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये एकदिवसीय मालिका खेळणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पाच एकदिवसीय मालिका २२ मार्च ते ३१ मार्च दरम्यान खेळविण्यात येणार आहे.
मागील वर्षी केप टाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यांत चेंडू छेडछाड प्रकरणात स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरला एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यांचा बंदीचा कार्यकाळ पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेदरम्यान संपेल आणि २९ मार्चला ते दोघेही पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या संघाकडुन खेळण्यासाठी पात्र होतील.
स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरवरील बंदी समाप्त होताच त्यांची संयुक्त अरब अमिरीतीमध्ये पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेदरम्यान
संघात निवड होऊ शकते.
मालिकेतील पहिले दोन सामने २२ आणि २४ मार्चला शारजाह येथे तीसरा सामना २७ मार्चला अबुधाबीत तर शेवटचे दोन सामने दुबईत २९ आणि ३१ मार्चला खेळविण्यात येणार आहे.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएलला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेमुळे ऑस्ट्रलियाचे खेळाडु आयपीएलच्या सुरुवातीला मुकतील. या मालिकेदरम्यान संघात असणारे खेळाडु २ एप्रिलनंतर आयपीएल खेळण्यास उपलब्ध असतील. पण आयपीएलनंतर २०१९ ची विश्वचषक स्पर्धा आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया बोर्ड काय निर्णय घेतं हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.