---Advertisement---

चौथ्या ऍशेस सामन्यात शून्यावर बाद होणाऱ्या डेव्हिड वॉर्नरच्या नावावर झाले हे ३ नकोसे विक्रम

---Advertisement---

मँचेस्टर। इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ओल्ड ट्रॅफर्डवर सुरु असलेल्या चौथ्या ऍशेस कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 6 बाद 186 धावांवर घोषित करत पहिल्या डावातील 196 धावांच्या आघाडीसह इंग्लंडला विजायासाठी 383 धावांचे आव्हान दिले आहे.

या आव्हानाचा पाठलाग करतना चौथ्या दिवसाखेर इंग्लंडने 2 विकेट गमावत 18 धावा केल्या आहेत. तसेच ते अजून 365 धावांनी पिछाडीवर आहेत.

ऑस्ट्रेलिया या सामन्यात जरी भक्कम स्थितीत असली तरी त्यांचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर सध्या फलंदाजी करताना संघर्ष करत आहे. तो या सामन्यातील दोन्ही डावात शून्य धावेवर बाद झाला आहे. विशेष म्हणजे दोन्ही डावात त्याला इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले आहे.

त्याचबरोबर वॉर्नरने शून्य धावेवर बाद होण्याची 2019 ऍशेस मालिकेतील ही तिसरी वेळ असून तो सलग तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे त्याच्या नावावर काही नकोसे विक्रम झाले आहेत.

वॉर्नरने केले हे नकोसे विक्रम –

#ब्रॉडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे फलंदाज –

3 – डेव्हिड वॉर्नर

2 – एबी डीविलिएर्स, रॉस टेलर, अझर अली, टॉम लॅथम, केएल राहुल, विरेंद्र सेहवाग, पीटर सिडल, जेपी ड्यूमिनी, सुरंगा लकमल

#ऍशेसमधील एका कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शून्यावर बाद होणारा वॉर्नर 10 वा सलामीवीर फलंदाज.

#2019 च्या ऍशेस मालिकेत वॉर्नर सातव्यांदा एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे. त्यामुळे एका कसोटी मालिकेत सलामीवीर फलंदाजाने सर्वाधिकवेळा एकेरी धावसंख्येवर बाद होण्याच्या विश्वविक्रमाशी वॉर्नरने बरोबरी केली आहे.

एका कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळा एकेरी धावसंख्येवर बाद होणारे सलामीवीर फलंदाज-

7 – अंशुमन गायकवाड (विरुद्ध विंडीज, 1083-84)

7 – माईक अर्थरटॉन (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1997)

7 – डेव्हिड वॉर्नर (विरुद्ध इंग्लंड, 2019)

#कसोटीमध्ये डेव्हिड वॉर्नरला सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज – 

11 – स्टुअर्ट ब्रॉड 

9 – जेम्स अँडरसन

9 – आर अश्विन

6 – उमेश यादव

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरने विराट कोहली, अमलाला मागे टाकत रचला नवा इतिहास

परदीप नरवालने प्रो कबड्डीत ‘सुपर टेन’चे अर्धशतक पूर्ण करताच रचला इतिहास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment