इंडियन प्रिमीयर लीगच्या सनराइजर्स हैद्राबाद संघाचा कर्णधार डेविड वॉर्नरने, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूंचा मिळून सार्वकालिक आयपीएल एकादश संघ निवडला आहे. त्याने आपल्या या संघात भारताचा हिटमॅन रोहित शर्मा आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांचा समावेश केला आहे. David Warner’s all time ipl xi.
परंतु, आश्चर्याची गोष्ट ही आहे की, त्याने आपल्या संघात ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसन आणि भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगला सामाविष्ट केले नाही.
क्रिकबझवर बीसीसीआयचे प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगलेंना दिलेल्या मुलाखतीत वॉर्नरने आपल्या सार्वकालिक आयपीएल संघाची निवड केली. त्याने स्वत:ला आणि रोहितला संघातील सलामीवीर फलंदाज म्हणून निवडले आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराटला तिसऱ्या आणि चेन्नई सुपर किंग्सचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी ठेवले आहे.
तर, ५व्या आणि ६व्या क्रमांकासाठी वॉर्नरने २ दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटूंना निवडले आहे. हे २ अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणजे भारताचा हार्दिक पंड्या आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल. शिवाय, एमएस धोनी हा वॉर्नरच्या सार्वकालिक आयपीएल संघाचा यष्टीरक्षक फलंदाज आहे.
गोलंदाजांविषयी बोलायचे झाले तर, वेगवान गोलंदाजीसाठी वॉर्नरने मिशेल स्टार्क, जसप्रीत बुमराह आणि आशिष नेहराची निवड केली आहे. तर, फिरकी गोलंदाजीसाठी त्याने युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना संयुक्तपणे निवडले आहे.
असा आहे वॉर्नरचा सार्वकालिन आयपीएल संघ-
रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, विराट कोहली, सुरेश रैना, ग्लेन मॅक्सवेल, हार्दिक पंड्या, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मिशेल स्टार्क, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, कुलदीप यादव/युजवेंद्र चहल
ट्रेंडिंग घडामोडी-
लांब केसातील धोनीचा फोटो शेअर करत सीएसकेने जागवल्या ‘या’ दौऱ्याच्या आठवणी
क्रिकेट शिकणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, स्टिव्ह स्मिथ देतोय ऑनलाईन…
रोहित-विराट नाही तर ‘या’ क्रिकेटपटूने मारले आहेत टी२०…