---Advertisement---

मालदीवच्या बारमध्ये डेविड वॉर्नर आणि समालोचकामध्ये झाली हाणामारी! जाणून घ्या पूर्ण प्रकरण

On: रविवार, मे 9, 2021 12:48 PM
---Advertisement---

कोविड-१९ महामारीचा झटका इंडियन प्रीमियर लीग २०२१ ला बसला आहे. २९ सामने झाल्यानंतर बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी हा हंगाम स्थगित केला आहे. त्यामुळे सहभागी खेळाडू आणि इतर सदस्य घरी परतण्याच्या मार्गावर आहेत. परंतु ऑस्ट्रेलियन सरकारने लावलेल्या प्रवास निर्बंधांमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू अजून मायदेशी परतू शकले नाहीत.

भारतातील वाढती कोरोनाची परिस्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मालदीवमध्ये हलवण्यात आले आहे. अशात मालदीवच्या एका बारमध्ये डेविड वॉर्नर आणि मायकल स्लेटर यांच्यात हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. परंतु दोन्ही दिग्गजांनी हे प्रकरण खोटे असल्याचे सांगितले आहे.

संडे टेलीग्राफमधील वृत्तानुसार, सनरायझर्स हैदराबाद संघाचा माजी कर्णधार वॉर्नर आणि ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू व समालोचक स्लेटर यांच्यात बारमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरुन शाब्दिक बाचाबाची झाली. पुढे त्यांचा वाद इतका वाढला की, त्यांच्यात हाणामारी झाली.

या प्रकरणाबद्दल स्पष्टीकरण देताना स्लेटर यांनी सांगितले की, “मी आणि वॉर्नर जुने मित्र आहोत. आमच्यात कोणत्याही गोष्टीवरुन वाद झाला नाही.” वॉर्नरनेही याबाबत बोलताना सांगितले आहे की, “आमच्यात कसलाही वाद झालेला नाही. मला माहिती नाही की, तुम्ही छोट्या गोष्टीवर एवढे कसे लिहिता. तेही तुम्ही स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेले नसताना. तुम्ही स्वत: त्यावेळी तिथे उपस्थित नव्हता. मग पक्के पुरावे नसताना काहीही लिहिणे चुकीचे आहे.”

वॉर्नर आणि स्लेटर यांच्या वक्तव्यनुसार त्यांच्यात मैत्री असल्याचे बऱ्याचदा दिसून आले आहे. हे दोन्ही दिग्गज स्काय स्पोर्ट्स रेडिओ आणि चॅनल ९ वरील बऱ्याच कार्यक्रमात एकत्र दिसून आले आहेत.

ऑस्ट्रेलियाने लावलेत यात्रेवर प्रतिबंध
आयपीएल २०२१ स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे जवळपास ३८ सदस्य अजून घरी परतू शकलेले नाहीत. यात खेळाडू, प्रशिक्षक, ऑफिशियल्स आणि समालोचक यांचा समावेश आहे. त्यांना चार्टर्ड विमानाद्वारे मालदीवमध्ये हलवण्यात आले असून ते आता मालदीवमध्ये विलगीकरणात आहेत. त्यांना २ आठवडे तिथेच थांबावे लागणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाच्या सरकारने १५ मेपर्यंत भारतातून येणाऱ्या विमानांवर निर्बंध घातले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल स्थगित झाल्यानंतर सीएसके शिलेदाराच्या पत्नीला केली जातेय शिवीगाळ, कारण धक्कादायक

‘विरुष्का’च्या हाकेला युझवेंद्र चहलचा प्रतिसाद, कोरोना विरोधी मोहिमेत दिली ‘इतक्या’ रुपयांची देणगी

‘हे’ आहेत कसोटी चॅम्पियनशीपचे सर्वात यशस्वी कर्णधार, अव्वलस्थानचं नाव पाहून बसेल धक्का!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---