---Advertisement---

‘हे’ आहेत कसोटी चॅम्पियनशीपचे सर्वात यशस्वी कर्णधार, अव्वलस्थानचं नाव पाहून बसेल धक्का!

On: रविवार, मे 9, 2021 11:36 AM
---Advertisement---

येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान क्रिकेट चाहत्यांना भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघामध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पहायला मिळणार आहे. टी-२० आणि वनडे क्रिकेट आल्यापासून पारंपरिक कसोटी क्रिकेटकडे चाहत्यांचा कल कमी होऊ लागला होता. त्यामुळे चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी आयसीसीने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेत ९ संघांनी सहभाग घेतला होता. २०१९ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेत प्रत्येक संघाला ६-६ मालिका खेळण्याची संधी मिळणार होती. परंतु २०२० मध्ये कोरोनाने जगभरात थैमान घातले होते. त्यानंतर सरासरी गुण काढून अंतिम २ संघ निवडण्यात आले.

या स्पर्धेत अनेक विक्रम पाहायला मिळाले. तसेच या स्पर्धेत असेही कर्णधार आहेत, ज्यांची आतापर्यंतची विजयाची टक्केवारी ही ५० टक्क्यांपेक्षा अधिक राहिली आहे. येथे आम्ही कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वात यशस्वी ६ कर्णधारांचा (ज्याची टक्केवारी जास्त तो सर्वात यशस्वी कर्णधार) आढावा घेतला आहे. चला तर पाहूया….

१) बाबर आजम (१०० %)- पाकिस्तान संघाचा सलामीवीर फलंदाज बाबर आजम पाकिस्तान संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम पोहचवू शकला नाही. परंतु कर्णधार म्हणून या स्पर्धेत त्याची विजयाची टक्केवारी १०० टक्के आहे. हो, हे खरं आहे. २०२१ मध्ये त्याला दोन सामन्यात पाकिस्तान संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. यात त्याला दोन्हीही कसोटी सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते.

२) विराट कोहली (७१ टक्के)- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली येत्या १८ जून रोजी न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याने आतापर्यंत या स्पर्धेत १४ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यात त्याला १० सामन्यात विजय मिळवण्यात यश आले तर ४ सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ७१.४२ टक्क्यांच्या विजयी सरासरीसह तो दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे.

३) केन विलियमसन (६७ टक्के)- न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसन हा येत्या १८ जून रोजी होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना करणार आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत केन विलियमसनने आपल्या नेतृत्वात न्यूझीलंड संघाला ९ सामन्यांपैकी ६ सामन्यात विजय मिळवून दिले तर ३ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्याची विजयी सरासरी ६६.६६ टक्के इतकी आहे.

४) अजिंक्य रहाणे (६७ टक्के)- भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना विराट कोहली पितृत्व रजा घेत माघारी परतला होता. त्यामुळे नेतृत्वाची जबाबदारी अजिंक्य रहाणेने पार पडली होती. त्याला ३ सामन्यात संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. यात त्याला २ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर एक सामना ड्रॉ राहिला होता. त्यामुळे त्याची विजयी सरासरी जवळपास ६७ टक्के आहे.

५) टीम पेन (५७ टक्के)- ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार टीम पेनने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत १४ सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व केले होते. यात त्याला ८ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. यामध्ये एक सामना ड्रॉ राहिला होता. त्यामुळे त्याची विजयी सरासरी ५७.१४ टक्के आहे.

६) जो रुट (५५ टक्के)- इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुटने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत २० सामन्यात इंग्लंड संघाचे नेतृत्व केले. या सामन्यांपैकी ११ सामन्यात त्याला विजय मिळवण्यात यश आले; तर ६ सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच ३ कसोटी सामने ड्रॉ राहिलो होते. यात भारतीय संघाविरुद्ध झालेल्या पराभवाचा देखील समावेश आहे. त्यामुळे ५५ टक्के विजयी सरासरीसह तो सहाव्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बुमराह अन् शमीपेक्षाही भुवनेश्वर कुमार होता कसोटी चॅम्पियनशीपसाठी प्रबळ दावेदार, तरीही झाला संघाबाहेर!

कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामन्यासाठी अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन, दिग्गज फिरकीपटूचं स्थान धोक्यात!

आधी वाढलेलं वजन कमी कर, मग निवडीचा विचार करू; बीसीसीआयचा ‘या’ भारतीय क्रिकेटपटूला इशारा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---