---Advertisement---

‘विरुष्का’च्या हाकेला युझवेंद्र चहलचा प्रतिसाद, कोरोना विरोधी मोहिमेत दिली ‘इतक्या’ रुपयांची देणगी

On: रविवार, मे 9, 2021 11:55 AM
---Advertisement---

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तसेच बेड, ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय सेवांचा तुटवडा जाणवू लागल्यामुळे रोज हजारो लोक या प्राणघातक विषाणूचा शिकार बनत आहेत. त्यामुळे परदेशी क्रिकेटपटू, भारतीय क्रिकेटपटू आणि सेलेब्रिटी मदत करण्यास पुढे येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच विराट कोहलीने एक कोरोना विरेधी अभियान सुरू केले होते, ज्यामध्ये आता भारतीय संघातील फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल याने मोलाचे योगदान दिले आहे.

शुक्रवारी (७ मे) भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी केट्टो संस्थेसोबत एक अभियान राबवत २ कोटींची मदत केली होती. यासोबतच त्यांनी या अभियानाद्वारे एका आठवड्यात ७ कोटी जमा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्यांच्या या अभियानाला लोक चांगला प्रतिसाद देत आहेत.

अवघ्या २४ तासातच या संस्थेला ३.४ कोटी देणगी देण्यात आली आहे. यामध्ये भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज चहल याने देखील मोलाचा हातभार लावत ९५००० रुपयांची मदत केली आहे.

केट्टो ही आशियातील सर्वात मोठी विश्वसनीय संस्था आहे, जिथे कुठल्याही चांगल्या उपक्रमासाठी निधी गोळा करणे, दान करणे आणि लोकांना वैद्यकीय सेवा देण्याचे काम केले जाते. तसेच या देणगीसह चहलचा, विरुष्काच्या अभियानात सर्वात जास्त देणगी देणाऱ्या टॉप-१० देणगीदारांच्या यादीत समावेश झाला आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यामुळे युजवेंद्र चहल आपल्या घरी परतला आहे. तसेच भारतीय संघ आता इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या संघात युजवेंद्र चहलला स्थान देण्यात आले नाहीये.

विराट कोहलीने केले होते आवाहन
विराट कोहलीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामधे तो आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा दिसून आले होते. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला होता की, “मी आणि अनुष्काने, केट्टोसोबत मिळून एक मोहीम सुरू केली आहे. ज्यामुळे कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी अधिक देणगी जमा करता येईल. त्यामध्ये आपण केलेल्या सहकार्याने आम्हाला आनंद होईल. आपण एकत्र येऊया आणि आपल्या आजूबाजूच्या कोरोनापिडीतांची सेवा करू आणि त्यांना मदत करूया.”

महत्त्वाच्या बातम्या-

‘हे’ आहेत कसोटी चॅम्पियनशीपचे सर्वात यशस्वी कर्णधार, अव्वलस्थानचं नाव पाहून बसेल धक्का!

बुमराह अन् शमीपेक्षाही भुवनेश्वर कुमार होता कसोटी चॅम्पियनशीपसाठी प्रबळ दावेदार, तरीही झाला संघाबाहेर!

कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामन्यासाठी अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन, दिग्गज फिरकीपटूचं स्थान धोक्यात!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---