भारतीय सिनेमे सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. अनेकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हिंदी गाणी आणि डायलॅगवर व्हिडिओ तयार करून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात, त्यामुळे या सिनेमांविषयी जगभरता कुतूहल निर्माण होत आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला दाक्षिणात्य सिनेमा ‘पुष्पा’ (Pushpa) खास चर्चेच राहिला. आता बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा ‘बच्चन पांडे’ (Bachchan Pandey) लवकरच प्रदर्शित होणार आहे आणि क्रिकेटपटूंनी त्यावर आधारित व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात केली आहे.
अक्षय कुमारच्या बच्चन पांडेचा टायटल ट्रॅक लोकांना खूप आवडला आहे. या गाण्यावर अनेकांनी व्हिडिओ तयार केले आहेत. स्वतःच्या व्हिडिओ आणि रिल्समुळे नेहमी चर्चेत असणारा ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) आणि वेस्ट इंडीजचा दिग्गज अष्टपैलू ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) यांनी या नवीन चिंत्रपटातील गाण्यावर रिल तयरा केल्या आहेत आणि चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्टही केल्या आहेत. बच्चन पांडेच्या टायटल ट्रॅकवर दोघांनी त्यांच्या डान्स स्टेप्स चांगल्या प्रकारे केल्या आहेत.
ड्वेन ब्रावोने शेअर केलेल्या व्हिडिओत तो काळ्या रंगाच्या टी-शर्टवर दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने अक्षयला आव्हानही दिली आहे. कॅप्शनमध्ये ब्रावोने लिहिले की, चॅम्पियन अक्षयला टक्कर देण्यासाठी तयार आहे.
https://www.instagram.com/reel/CahoPByDi0w/?utm_source=ig_web_copy_link
डेविड वॉर्नरही ब्रावोप्रमाणे अक्षयची हुक स्टेप करताना दिसत आहे. वॉर्नने ही रिल शेअर केल्यानंतर अक्षयल टॅग करून याविषयी त्याचे मत विचारले आहे. कॅप्शनमध्ये वॉर्नरने लिहिले की, “मी कसे केले अक्षय कुमार.” कॅप्शनमध्ये पुढे त्याने हॅशटॅग मार खायेगा आणि हॅशटॅग बच्चन पांडे असे लिहिले आहे. सोबतच इमोजींचा वापरही केला आहे.
https://www.instagram.com/reel/Caj37LWpiC2/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, (Bachchan Pandey Release Date) बच्चन पांडेचा ट्रेलर प्रदर्शित होऊन काहीच दिवस झाले आहेत. सिनेमाच्या ट्रेलरचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अक्षय कुमारचे आतापर्यंतचे सर्वात वेगळे रूप सिनेमात पाहायला मिळणार आहे. ट्रेलरनंतर सिनेमातील एक गाणेही प्रदर्शित केले गेले. सिनेमा होळीच्या दिवशी १८ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
बापरे बाप! ५४४७ चेंडू अन् १९८१ धावा, इतिहासातील सर्वात मोठी कसोटी; ‘इतके’ दिवस चाललेला सामना
आयएसएल: मुंबई सिटी एफसीचे आव्हान संपल्यात जमा, केरला ब्लास्टर्सचा दणदणीत विजय
विराट १०० वा कसोटी करणार खास? ३८ धावा करताच सचिन, द्रविड, सेहवागच्या पंक्तीत बसण्याची संधी