टी-२० विश्वचषक २०२१ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात ८ विकेट्स राखून न्यूझीलंडला नमवले आहे. ऑस्ट्रेलियासाठी हे त्यांचे टी-२० विश्वचषकातील पहिलेच जेतेपद ठरले आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी या सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली आणि न्यूझीलंडने दिलेले मोठे लक्ष्य १९ व्या षटकात गाठले. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने टिम साउदीच्या चेंडूवर चौकार मारून सामन्याचा शेवट केला. यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू जल्लोष करू लागले. दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नर स्टीव स्मिथनेही या क्षणाचा पुरेपूर आनंद घेतला.
डेविड वॉर्नर आणि स्टीव स्मिथने ड्रेसिंग रूममधून ज्याप्रकारे या विजयाचा आनंद लुटला, तो पाहण्याजोगा होता. विजयानंतर वॉर्नर खूपच उत्साहात पाहायला मिळाला, तर स्टीव स्मिथच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. हे दोघे आनंदात एकमेकांच्या गळ्यात पडलेले दिसले. तसेच मार्कस स्टॉयनिस आणि एडम झम्पा हे दोघे ऑस्ट्रेलियाने विजय मिळाल्यानंतर तत्काळ मैदानावर धावत गेले. त्यांनी मिशेल मार्शची गळाभेट घेतली.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे सर्वच खेळाडू मैदानावर आले आणि आनंद साजरा करू लागले. आयसीसीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा हा खास व्हिडिओ शेअर केला आहे. चाहत्यांनी हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल केला आहे.
https://www.instagram.com/reel/CWQ8b8NFJi9/?utm_source=ig_web_button_share_sheet
दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १७२ धावा केल्या. न्यूझीलंड संघाने ज्या चार विकेट्स गमावल्या, त्यापैकी तीन विकेट्स ऑस्ट्रेलियाच्या एकट्या जोस हेजलवुडने घेतल्या. त्याने त्याच्या चार षटकात अवघ्या १६ धावा दिल्या. त्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या ऍडम झम्पाने एक विकेट्स घेतला आणि २६ धावा दिल्या. न्यूझीलंडसाठी सर्वाधिक ८५ धावा केन विलियम्सनने केल्या.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नरने ५३ आणि मिशेल मार्शने नाबाद ७७ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजतेपद मिळवून दिले. त्याव्यतिरिक्त ग्लेन मॅक्सवेलनेही नाबाद २६ धावांचे महत्वाचे योगदान दिले. या दोघांच्या अर्धशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकांत ऑस्ट्रेलियाने १७३ धावांचे आव्हान २ विकेट्स गमावत पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या-
दुबई स्टेडियम, दुसऱ्यांदा फलंदाजी अन् विजेत्या संघाचे आहे खास कनेक्शन, ऑस्ट्रेलियालाही झाला फायदा
Video: विलियम्सनवर चढला पंतचा फिवर, टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये एका हाताने ठोकला षटकार