ऑस्ट्रेलियाचा स्टार बॅट्समन डेव्हिड वॉर्नर आपल्या सोशल मीडियावरील विविध व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असतो. सुरुवातीला वॉर्नरने टिक टॉक वरील आपल्या व्हिडिओंनी सर्वांचे मनोरंजन केले होते. मागील काही काळापासून वॉर्नर आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत आहे. यामध्ये तो हॉलीवूड तसेच बॉलीवूड मधील वेगवेगळ्या चित्रपटांतील नायकांच्या चेहऱ्यावर आपला चेहरा लावून मनोरंजक व्हिडिओ बनवत आहे. आता पुन्हा एकदा तो अशाच एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे.
वॉर्नरच्या या व्हिडिओंना चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे . नुकताच वॉर्नरने बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्या ‘डॉन २’ या चित्रपटातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये वॉर्नरने शाहरुखच्या चेहऱ्यावर त्याचा स्वत:चा चेहरा लावलेला दिसत आहे.
वॉरनने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन लिहिलेले,’ मी या व्हिडिओमधील हिंसेसाठी तुमची माफी मागतो, पण मला नाही वाटत तुम्ही या व्हिडिओला ओळखू शकतात ‘. काही वेळातच वॉर्नरचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला.
https://www.instagram.com/p/CJGBKAQleG_/
भारताविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना वॉर्नरला दुखापत झाली होती. त्यामुळे वॉर्नर भारताविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत आणि पहिल्या कसोटीत खेळला नाही. तसेच तो भारताविरुद्ध २६ डिसेंबरला सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातूनही बाहेर गेला आहे. सध्या वॉर्नर आपल्या दुखापतीतून सावरत असून, सर्व चाहत्यांना त्याच्या मैदानावरील पुनरागमनाची प्रतिक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हा तर कहरच झाला! ‘या’ फलंदाजाने मारलेल्या षटकाराचा चेंडू चक्क झाडाच्या फांद्यांमध्ये अडकला
व्हिडिओ: भारतीय संघ सरावात घेतोय कठोर मेहनत, दुसर्या कसोटीतील प्लेइंग इलेव्हनचेही मिळाले संकेत
“मी, झहीर, हरभजन, सेहवाग, आमच्यापैकी कोणीही विचार केला नव्हता धोनी कर्णधार होईल”
ट्रेंडिंग लेख –
टॉप ३ : टी२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च धावांची खेळी करणारे यष्टिरक्षक
सोळा वर्षे आणि सोळा गोष्टी! जाणून घ्या धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोमांचक प्रवास
IND v AUS: कसोटी सामन्यांदरम्यान स्टंप माईकमधून ऐकू आलेल्या ३ मजेदार शाब्दिक चकमकी