इंडियन प्रीमियर लीगमधील सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेविड वॉर्नरला त्याच्या तूफानी फलंदाजीसाठी ओळखले जाते. रविवारी (१८ ऑक्टोबर) अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२०च्या ३५व्या सामन्यातही त्याने ३३ चेंडूत ४७ धावा कुटल्या. यासह त्याने आयपीएलमधील एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
वॉर्नर आयपीएलच्या १३ हंगामाच्या इतिहासात ५००० धावांचा टप्पा पार करणारा पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे. त्याने आयपीएलमध्ये १३५ सामने खेळत ४३.०५च्या सरासरीने ५०३७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४ शतकांचा आणि ४६ अर्धशतकांचा समावेश आहे.
या विक्रमाच्या यादीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्याने आतापर्यंत १८६ सामन्यात ५७५९ धावा केल्या आहेत. तर चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज सुरेश रैना (१९३ सामने, ५३६८ धावा) आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (१९७ सामने, ५१३८ धावा) अनुक्रमे दूसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.
परदेशी खेळाडूंविषयी बोलायचं झाले तर, एबी डिविलियर्सने आयपीएलमध्ये ४६८० धावा आणि ख्रिस गेलने ४५३७ धावा केल्या आहेत. त्यामुळे हे दोन्ही फलंदाज वॉर्नरच्या विक्रमाच्या बरेच दूर आहेत.
असे असले तरी, वॉर्नरने विराट, रैना आणि रोहितपेक्षाही अधिक वेगाने आयपीएलमधील ५००० धावांचा आकडा गाठला आहे. त्याने केवळ १३५ सामन्यात हा विक्रम केला आहे, तर उर्वरित अव्वल- ३ फलंदाजांना ही धावसंख्या गाठण्यासाठी कमीत-कमी १५० सामने लागले आहेत.
हैदराबादच्या अथक परिश्रमानंतर कोलकाताविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला होता. मात्र कोलकाताने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली.
महत्त्वाच्या बातम्या-
लॉकी फर्ग्युसनचा ‘सुपर’ ओव्हर थरार, हैदराबादच्या जबड्यातून खेचला विजय
हैदराबादला पराभवाची धूळ चारणाऱ्या कोलकाताला तब्बल ११ वर्षांनी सुपर ओव्हरमध्ये यश
मैत्री असावी तर अशी! चेन्नई वि. दिल्ली सामन्यात जडेजाच्या ‘त्या’ कृत्याने जिंकली सर्वांची मने
ट्रेंडिंग लेख-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…
आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष