ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका गुरुवारी (14 डिसेंबर) खेळला जाणार आहे. आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असणाऱ्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील. त्यातही यजमान ऑस्ट्रेलियन संघाचे पारडे काही केल्या जड दिसत आहे. ऑस्ट्रेलियन दिग्गज डेव्हिड वॉर्नर याच्यासाठी ही शेवटची कसोटी मालिका असणार आहे. अशात सलामीवीर फलंदाजापासून पाकिस्तान संघाला सर्वाधिक धोका असू शकतो.
पाकिस्तान संघ सध्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. पर्थवर मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (14 डिसेंबर) सुरू होईल आणि 18 डिसेंबर रोजी सामना शेवटचा दिवस आहे. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबर्नमध्ये खेळला जाईल. मालिकेतील तिसरा आणि सेवटचा सामना सिडनीमध्ये 3 ते 7 जानेवारीदरम्यान आयोजित केला गेला आहे. डेव्हिड वॉर्नर (David Warner) ही कसोटी मालिका संपल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. सलामीवीर फलंदाजाने आधीच तशी माहिती सर्वांना दिली आहे. कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळताना वॉर्नरचे प्रदर्शन पाहण्यासारखे असेल.
कसोटी क्रिकेटमध्ये वॉर्नरने सर्वोत्तम प्रदर्शन जर कोणत्या संघापुढे केले असेल, तर तो पाकिस्तान संघ आहे. पाकिस्तानविरुद्ध वॉर्नरचे आकडे जबरदस्त राहिले आहेत. त्याने या संघाविरुद्ध 5 कसोटी शतके ठोकली आहेत. यात एका तिहेरी शतकाचाही समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध वॉर्नरने 83.53च्या सरासरीने 16 डावात 1253 धावा केल्या आहेत. 5 शतकांसह चार अर्धशतकांचाही यात समावेश आहे.
एखाद्या संघाविरुद्ध सर्वोत्तम सरासरीने धावा करण्याच्या बाबतीत वॉर्नरसाठी दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड संघ आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्याने 67.56च्या सरासरीने धावा केल्या आहेत. असे असले तरी, पाकिस्तानविरुद्ध खेळताना वॉर्नर एका वेगळ्याच फॉर्मात असतो. कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका असल्यामुळे सलामीवीर अधिकच जोमात खेळताना दिसू शकतो. यादरम्यानत त्याच्यावर कसल्याही प्रकारचा दबाव असणार नाही. दुसरीकडे पाकिस्तान संघात मागच्या काही दिवसांमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. कर्णधारापासून संघाचा सपोर्ट स्टाफ देखील बदलला गेला आहे. संघाच्या एकंदरीत प्रदर्शनावर या गोष्टींचा फरक पडू शकतो.
वॉर्नरची बॅट चालली, तर तो या निरोपाच्या मालिकेला नेहमी लक्षात राहण्यासारखे बनवू शकतो. दुसरीकडे पाकिस्तानसाठी ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा स्वप्नच बनून राहू शकते. मागच्या दोन वर्षात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामनाच खेळला नाहीये. दोन्ही संघांची आमने सामने आकडेवारी पाहिली, तर पारडे ऑस्ट्रेलियाकडे झुकलेले दिसत आहे. अशात पुढच्या काही दिवसांमधील पाकिस्तानचे प्रदर्शन देखील पाहण्यासारखे असेल. (David Warner can put up a stunning performance in the last Test series of his career)
महत्वाच्या बातम्या –
श्रीलंकन संघाची प्रदर्शन आता दिग्गजांच्या निर्णयावर ठरणार! बोर्डाकडून नवीन निवड समितीची घोषणा
वर्ल्डकमधील शमीच्या प्रदर्शनची घेतली जाणार दखल, वेगवान गोलंदाजाला भारत सरकारकडून मिळणार खास भेट!