इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2025चा मेगा लिलावाचा (Mega Auction) थरार सौदी अरेबियातील जेद्दाह येथे रंगला आहे. पण यामध्ये आयपीएल विजेता कर्णधार डेव्हिड वाॅर्नर (David Warner) अनसोल्ड ठरला आहे.
शेवटच्या आयपीएल हंगामात डेव्हिड वाॅर्नर (David Warner) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा भाग होता. दरम्यान त्याने शेवटच्या हंगामात दिल्लीसाठी 8 सामने खेळले. दरम्यान त्याने 21च्या सरासरीने फलंदाजी करताना 168 धावा केल्या होत्या. शेवटच्या हंगामात वाॅर्नला केवळ एकच अर्धशतक झळकावता आले होते.
डेव्हिड वाॅर्नरच्या आयपीएल (IPL) कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आयपीएलमध्ये 184 सामने खेळले होते. दरम्यान त्याने 40.52च्या सरासरीने फलंदाजी करताना 6,565 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने 62 अर्धशतकांसह 4 शतके झळकावली आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 139.77 राहिला आहे. डेव्हिड वाॅर्नरने (David Warner) त्याच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादला (SRH) 2016ला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
केएल राहुलला मिळाले अवघे 14 कोटी रुपये! आरसीबी नाही तर या संघाने लावली सर्वात मोठी बोली
युझवेंद्र चहल आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा भारतीय स्पिनर! या संघानं लावली 18 कोटींची बोली
रिषभ पंत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! अवघ्या काही मिनिटांत मोडला श्रेयस अय्यरचा रेकॉर्ड