ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना रविवारी निकाली निघाला. मालिकेतील हा दुसरा आणि शेवटचा सामना असून ऑस्ट्रेलियाने यात 419 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे खेळू शकला नाही. कमिन्सच्या अनुपस्तितीत स्टिव स्मीथ याने संघाचे नेतृत्व केले. सामना जिंकल्यानंतर स्मिथने खास प्रतिक्रिया दिली. यावेळी डेविड वॉर्नर याच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घातलेल्या कर्णधारपदाच्या बंदीविषयी देखील प्रतिक्रिया दिली.
डेविड वॉर्नर (David Warner) 2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात चेंडुशी छेडछाड प्रकरणात दोशी आढळला होता. त्यावेळी स्टीव स्मिथ आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांना देखील या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून बंदीची शिक्षा सुनावली गेली होती. या दोघांवरील नेतृत्वाची बंदी नंतर बोर्डाने उठवली, मात्र वॉर्नरवर अजूनही कर्णधारापदासाठी बंदी आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये वॉर्नरला संघाचे नेतृत्व करण्यासाठी बोर्डाने परवानगी द्यावी, यासाठी मागणी होत आहे. स्वतः वॉर्नरने देखील क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे नेतृत्वाची संधी मिळावी यासाठी अर्ज केला होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने माघात घेत सोशल मीडिया मोठी पोस्ट केली होती. पोस्टमध्ये वॉर्नरने त्यांच्या क्रिकेट बोर्डावर जोरादार निशाणा देखील साधला होता.
अशात आता स्टीव स्मिथ (Steve Smith) याने वॉर्नरला त्याच्ये आणि संघातील इतर खेळाडूंचे समर्थन असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर वॉर्नर म्हणाला की, “माझ्या मते कर्णधारपदावर अजीवन बंदी चुकीची आहे. मी जसे संघासाठी योगदान दिले आहे, तसेच त्यानेही दिले आहे. आमच्यासाठी तो संघातील एक मोठा खेळाडू आहे. मैदानाच्या बाहेर किंवा आतमध्ये तो संघासाटी महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे.”
“ही वेळ वॉर्नरसाठी कठीण आहे. वॉर्नरचे म्हणणे एवढेच आहे की, त्याने त्याचे काम पूर्ण केले आहे आणि या सर्व गोष्टी मागे सोडल्या आहेत. त्याच्याकडून आम्हाला पूर्ण समर्थन मिळाले. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत देखील आमच्यासाठी अप्रतिम प्रदर्शन करेल, असी अपेक्षा आहे,” असेही स्मिथ पुढे बोलताना म्हणाला. (David Warner got support from Steve Smith, said the captaincy ban was wrong.)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय महिलांनी दुसऱ्या टी20त काढला पहिल्या पराभवाचा वचपा, ऑस्ट्रेलियाला सुपर ओव्हरमध्ये चारली धूळ
रोनाल्डोला रडताना पाहून भारतीय क्रिकेट दिग्गज झाला भावूक; ट्विट करत लिहिले…