सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. तत्पूर्वी या वर्षाच्या अखेरिस भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात बाॅर्डर गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) खेळली जाणार आहे. दोन्ही संघ 22 नोव्हेंबर रोजी पहिल्या सामन्यासाठी आमने-सामने असणार आहेत. तत्पूर्वी आता ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नरने (David Warner) आश्चर्यकारक विधान केले आहे.
डेव्हिड वॉर्नर (David Warner) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. पण आता तो यू-टर्न घेण्याच्या तयारीत आहे. त्याने भारताविरूद्ध कसोटी मालिका खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बॉर्डर गावसकर मालिकेच्या तयारीसाठी 38 वर्षीय वॉर्नर शेफिल्ड शिल्डमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
डेव्हिड वॉर्नरने (David Warner) कोड स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “मी नेहमीच उपलब्ध असेल. फक्त कॉल येण्याची वाट पाहतोय. खरे सांगायचे तर, फेब्रुवारीमधील शेवटच्या कसोटी सामन्यापासून, खेळाडूंनी फक्त एक लाल चेंडू सामना खेळला आहे (शील्डची पहिली फेरी). माझी तयारी जवळपास सारखीच आहे. जर त्यांना या मालिकेसाठी (बॉर्डर गावस्कर ट्रॉफी) माझी खरोखर गरज असेल, तर मी पुढचा शिल्डचा सामना खेळण्यासही तयार आहे. मी योग्य कारणांसाठी निवृत्त झालो आणि मला खेळ पूर्ण करायचा होता. पण जर त्यांना कोणाची गरज असेल तर मी तयार आहे. यापासून मी मागे हटणार नाही.”
बॉर्डर गावसकर मालिकेचं पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
हेही वाचा-
IND vs NZ; पुण्यातील खेळपट्टी कशी असणार? फिरकीपटूंना मिळणार मदत?
टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संधी न मिळण्याबाबत काय म्हणाला संजू सॅमसन?
“गौतम गंभीरच्या नजरेला नजर मिळवायला भीती वाटायची”, संजू सॅमसनने सांगितला प्रसंग