वनडे विश्वचषकाच्या 13व्या हंगामात ऑस्ट्रेलिया संघ विजेता ठरला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारतीय संघाला 6 विकेट्सने मात दिली. भारतीय संघ विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार असला, तरी अंतिम सामन्यात संघ पूर्णपणे अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील हा सहावा वनडे विश्वचषक विजय ठरला. दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा या विजयात सहभागी असून त्याची एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
डेव्हिड वॉर्नर (David Warner) वनडे विश्वचषकाच्या इतिहासात रविवारी (19 नोव्हेंबर) दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात खेळला. विशेष म्हणजे या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियान संघाला विजय मिळाला आणि वॉर्नर विजयाचा आनंद लुटू शकला. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने प्रथम फलंदाजी करताना 240 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्सच्या नुकसानावर 43 षटकांमध्ये लक्ष्य गाठले आणि विजय मिळवला. वॉर्नर याआधी 2015 साली विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग देखील होता. अनेकांच्या मते वॉर्नर लवकरच निवृत्त होऊ शकतो. पण दिग्गज सलामीवीर वॉर्नरने स्वतः याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
त्याचे झाले असे की, वॉर्नरने कारकिर्दीतील दुसरा वनडे विश्वचषक रविवारी जिंकल्यानंतर सर्वत्र फोटो व्हायरल झाले. वॉर्नरने आतापर्यंतच्या वनडे कारकिर्दीत 109 सामन्यांमध्ये 109च्या सरासरीने 8487 धावा केल्या आहेत. एका वृत्तसंस्थेने वॉर्नरची वनडे विश्वचषकातील आकडेवारी ग्राफिक्सच्या माध्यमातून शेअर केली. पण या पोस्टसह दिलेले कॅप्शन ऑस्ट्रेलियन दिग्गजाला खटकले. “वॉर्नरच्या वनडे कारकिर्दीचा गौरवशाली रेकॉर्डसह शेवट,” असे कॅप्शन या पोस्टला दिले गेले होते. पण वॉर्नरच्या मते त्याची वनडे कारकीर्द इतक्यात संपली नाहीये. त्याने या पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहिले की, “कोण म्हणालं मी संपलो आहे.”
Who said I’m finished?? https://t.co/1WMACz33RL
— David Warner (@davidwarner31) November 20, 2023
37 वर्षीय वॉर्नरसाठी हा शेवटचा वनडे विश्वचषक मानला जात आहे. पण स्वतः वॉर्नर मात्र, हे मान्य करण्यासाठी अद्याप तयार दिसत नाहीये. अशात पुढचे किती दिवस तो देशासाठी खेळत राहणार, हा मोठा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. वॉर्नरची सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहून चाहत्यांच्या एकापेक्षा एक प्रतिक्रिया समोर येत आहेत. (David Warner has made his views clear after predicting retirement)
महत्वाच्या बातम्या –
जमलं रे! भारतीय क्रिकेटर वेंकटेश अय्यरने उरकला साखरपुडा, जोडप्याचे सुंदर फोटो तुफान व्हायरल
गेलचा लिजेंड्स लीगमध्ये जलवा, मारला एकाच हाताने षटकार, पाहा व्हिडिओ