विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेले ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघ 14 व्या सामन्यात आमने-सामने आहेत. लखनऊच्या इकाना स्टेडिअममध्ये रंगलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. चांगल्या सुरुवातीनंतर श्रीलंकेचा डाव ढेपाळला. त्याचवेळी पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने ग्राउंड स्टाफला कव्हर्स टाकण्यासाठी मदत केली.
David Warner helping the ground staffs when the rain came.
A beautiful gesture by Warner…..!!! pic.twitter.com/xUxrLmjuit
— Johns. (@CricCrazyJohns) October 16, 2023
या सामन्यात 32.1 षटकांचा खेळ संपल्यानंतर पावसाचे आगमन झाले. त्यामुळे खेळ थांबवावा लागला. यादरम्यान डेव्हिड वॉर्नरने ग्राउंड स्टाफला मदत करून चाहत्यांची मने जिंकली, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
श्रीलंका संघाने 32.1 षटकात 172/4 धावा केल्या होत्या आणि त्यानंतर मैदानावर जोरदार पाऊस सुरू झाला. पंचांनी ताबडतोब बेल्स खाली करून खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. ग्राउंड स्टाफने पटकन कव्हर घेतले आणि खेळपट्टीकडे धाव घेतली. त्यावेळी वॉर्नरने कव्हर्स धरून खेळपट्टीवर आणण्यात स्टाफला मदत केली. त्याची ही कृती चाहत्यांना खूप आवडली आहे.
या सामन्याचा विचार केल्यास श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कुसल परेरा व पथुम निसंका या जोडीने संघाला शतकी भागीदारी करून दिली. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने दोन बळी मिळवत संघाला पुनरागमनाची सुरुवात करून दिली. त्यानंतर ऍडम झम्पा याने चार तर मिचेल स्टार्कने दोन बळी घेत श्रीलंकेचा डाव अवघ्या 209 धावांवर संपुष्टात आणला. श्रीलंका संघासाठी दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके पूर्ण केली.
(David Warner Help Ground Staff After Rain He Ran For Covers In Lucknow)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाचे जोरदार कमबॅक! शतकी सलामीनंतर श्रीलंकेचा अवघ्या 209 धावांत उडाला खुर्दा
कॅप्टन असावा तर असा! पाकिस्तानच्या डावाला रोहितच्या ‘त्या’ निर्णयामुळे लागला सुरूंग, कुलदीपने केला खुलासा