ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर ९ वर्षांनंतर बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. वॉर्नरने बीबीएलमध्ये सिडनी थंडरसोबत दोन वर्षांचा करार केला असून आगामी हंगामासाठी तो संघाचा भाग असेल. यासोबतच डेव्हिड वॉर्नर बीबीएलऐवजी यूएईच्या आंतरराष्ट्रीय लीग टी-२० मध्ये भाग घेणार असल्याच्या या अटकळांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
डेव्हिड वॉर्नर नवीन यूएई लीगमध्ये दुबई कॅपिटल्सकडून खेळेल अशी अटकळ यापूर्वी वर्तवली जात होती. मात्र, त्याने सिडनी थंडरशी करार करून या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा हा दिग्गज फलंदाज तब्बल ९ वर्षांनंतर बिग बॅश लीगमध्ये पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘तिसऱ्या वनडेत भारताच्या प्लेइंग ११ मध्ये होणार बदल?’ वाचा माजी दिग्गजाला काय वाटतं
गरजेवेळी शार्दुल ठाकुरला कशी मिळते विकेट? गोलंदाजाने स्वतःच केलाय खुलासा