आयपीएल इतिहासातील सर्वात तेजस्वी खेळाडूंपैकी एक डेविड वॉर्नर आगामी आयपीएल 2025 मध्ये कोणत्या संघाकडून खेळणार? हा मोठा प्रश्न आहे. वॉर्नर गेल्या तीन हंगामांपासून दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत असला तरी आयपीएल 2024 वॉर्नरसाठी काही खास नव्हते. यामुळे दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी डेविड वॉर्नरला रिलीज करू शकते. याबाबत फ्रँचायझीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, वॉर्नर पुढील हंगामात जुनी फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादमध्ये पुनरागमन करू शकतो, अशा चर्चा होत आहेत. खुद्द वॉर्नरने तसे संकेत दिले आहेत.
वॉर्नरला सनरायझर्स हैदराबादची आठवण झाली!
वॉर्नर आता आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत असला तरी आता त्याला हैदराबादची उणीव भासू लागली आहे. वॉर्नरने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हैदराबादमधील चारमिनारचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याने लिहिले आहे की, ‘मी माझ्या आवडत्या जागेला खूप मिस करत आहे.’
INSTAGRAM STORY OF DAVID WARNER…!!!!
– Warner loves Hyderabad a lot. ❤️ pic.twitter.com/cUCYJCWQ02
— Johns. (@CricCrazyJohns) August 26, 2024
वॉर्नरने 2014 ते 2021 पर्यंत सनरायझर्स हैदराबादकडून क्रिकेट खेळले आहे. याशिवाय वॉर्नरने त्याच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादला आयपीएलचे विजेतेपदही मिळवून दिले आहे. 2016 मध्ये, वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभव करून पहिले विजेतेपद पटकावले होते. वॉर्नरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत हैदराबादकडून 95 सामने खेळले. या काळात वॉर्नरने फलंदाजी करताना 4014 धावा केल्या, ज्यामध्ये 2 शतके आणि 40 अर्धशतकांचाही समावेश आहे.
असे असले तरीही, आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादने वॉर्नरची हकालपट्टी केली होती. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने वॉर्नरला विकत घेतले. आता वॉर्नर दिल्लीकडून खेळतो. दिल्ली कॅपिटल्स हा देखील वॉर्नरचा जुना संघ आहे. वॉर्नरने आयपीएलमध्ये पदार्पण दिल्लीसाठीच केले होते. वॉर्नर 2009 ते 2013 दरम्यान दिल्लीकडून खेळला होता. वॉर्नरने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 184 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये वॉर्नरने 6565 धावा केल्या आहेत. वॉर्नरने आयपीएलमध्ये 4 शतके झळकावली आहेत.
हेही वाचा-
पहिल्यांदाच टी20 विश्वचषक खेळणार ‘या’ भारतीय क्रिकेटपटू, डब्लूपीएलमध्ये केलंय शानदार प्रदर्शन
अविश्वसनीय! 137 चेंडू खेळूनही उघडले नाही खाते, इंग्लंडच्या फलंदाजाची खेळी ठरली चर्चेचा विषय
घटस्फोटानंतर नताशाने सांगितला प्रेमाचा अर्थ; म्हणाली, “प्रेम कधी अपमान करत…”






