सनरायझर्स हैदराबाद संघाला रविवारी (१८ ऑक्टोबर) अबू धाबी येथे कोलकात नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात हैदराबाद संघाचा कर्णधार डेविड वॉर्नरने ४७ धावांची खेळी केली होती. या पराभवानंतर त्याने निराशा व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, आम्ही मागील तीन सामन्यांमध्ये विजयाच्या जवळ जाऊन पराभूत झालो.
वॉर्नर म्हणाला की, “मागील तीन सामन्यात आम्ही आव्हानाच्या खूप जवळ गेलो, पण ते पार करू शकलो नाही. मी नाराज आहे.”
याव्यतिरिक्त नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयावर तो म्हणाला की, “मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. दुबईवरून आल्यानंतर ही (अबू धाबीतील) खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली दिसत होती. सामन्यादरम्यान ही खेळपट्टी सावकाश झाली होती. परंतु कोणतेही निमित्त नसायला पाहिजे.”
डेविड वॉर्नरने केला पूर्ण प्रयत्न
आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाचे काही फलंदाज लवकर बाद झाले. परंतु मधल्या फळीत फलंदाजीला येऊन वॉर्नरने धडाकेबाज खेळी केली. त्याने सुरुवातीला वेळ घेतला आणि आव्हानापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. पुढे शेवटच्या २ षटकात त्याने वेगाने फलंदाजी केली. त्याने शेवटच्या षटकात कोलकाताचा वेगवान गोलंदाज आंद्रे रसेलला १७ धावा ठोकल्या. परंतु यावेळी त्याला १ धावेची आवश्यकता होती. परंतु त्याला शेवटच्या चेंडूवर एक धाव काढता आली नाही आणि सामना बरोबरीत सुटला.
सुपर ओव्हरमध्ये हैदराबाद संघाने २ विकेट्स गमावत २ धावा केल्या. हैदराबादने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने ३ धावा केल्या आणि सामना खिशात घातला.
सर्वात जलद ५००० धावांचा टप्पा पूर्ण
वॉर्नरने आयपीएल इतिहासात १३५ सामन्यात जलद ५००० धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रम केला आहे. याव्यतिरिक्त अशी कामगिरी करणारा तो एकमेव परदेशी खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-नादच खुळा! हैदराबादच्या ‘कॅप्टन’ने केलीय विराट, रोहित आणि रैनाच्या तिकडीला लाजवेल अशी कामगिरी
-लॉकी फर्ग्युसनचा ‘सुपर’ ओव्हर थरार, हैदराबादच्या जबड्यातून खेचला विजय
-हैदराबादला पराभवाची धूळ चारणाऱ्या कोलकाताला तब्बल ११ वर्षांनी सुपर ओव्हरमध्ये यश
ट्रेंडिंग लेख-
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
-दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…
-आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष