भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात स्टार फलंदाज डेविड वॉर्नरने भाग घेतला नाही. दुखापतीमुळे डेविड वॉर्नर भारताविरुद्धच्या टी२० मालिकेतही खेळला नव्हता. अशातच त्याचे चाहते त्याला खुप मिस करत आहेत, मात्र त्याने या चाहत्यांना निराश केले नाही.
डेविड वॉर्नर सध्या मैदानावर दिसला नाही, परंतू आपल्या सोशल मीडियावर बराच ऍक्टिव्ह दिसला. काही दिवसापासून तो भारतीय अभिनेत्यांच्या चेहर्याच्या जागी आपला चेहरा लावून काही चित्रपटातील व्हिडिओ पोस्ट करत आहे.
डेविड वॉर्नरने आपल्या इंस्टाग्रामवर फिल्मस्टार हृतिक रोशनच्या जागी स्वत:चा चेहरा लावलेला एक व्हिडीओ नुकताच पोस्ट केला आहे. डेविड वॉर्नरने हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहले आहे की, ‘लोकांच्या मागणीमुळे पुनरागमन करतोय.’
डेविड वॉर्नरला बॉलीवूड आणि टॉलिवूड पसंत आहे आणि यापूर्वी ही तो काही भारतीय चित्रपटातीव गाण्यांवर डान्स करताना दिसला आहे.
https://www.instagram.com/p/CI2osoHFv9y/
डेविड वॉर्नरला भारता विरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील दुसर्या सामन्यात दुखापत झाली होती. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या मांडीला दुखापत झाली होती. यामुळे तो भारता विरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत देखील खेळू शकला नव्हता. याशिवाय तो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही ऑस्ट्रेलिया संघाचा भाग नाही.
भारताविरुद्ध दोन वनडेत डेविड वॉर्नरची जबरदस्त कामगिरी
डेविड वॉर्नरने भारताविरुद्ध वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात 76 चेंडूत 69 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने 66 धावांनी जिंकला होता. त्याचबरोबर दुसर्या वनडे सुद्धा डेविड वॉर्नरने 77 चेंडूत 83 धावांची दमदार खेळी करताना हा सामना ऑस्ट्रेलियाला जिंकून दिला होता आणि मालिका आपल्या नावावर केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताला चौथा धक्का! अजिंक्य रहाणेच्या चुकीमुळे कर्णधार विराट कोहली रन आऊट?
अरर! लायनने ‘या’ भारतीय फलंदाजाला बनवले आपला ‘बकरा’, इतके वेळा धाडले तंबूत