---Advertisement---

डेव्हिड वाॅर्नरची धमाकेदार सुरुवात, क्रिकेटमध्ये केली जबरदस्त वापसी

On: सोमवार, मार्च 18, 2019 7:46 PM
---Advertisement---

2016 ला सनरायझर्स हैद्राबाद संघाचे नेतृत्व करताना आयपीएलचे विजेतेपद जिंकून देणाऱ्या डेव्हिड वॉर्नरचे यावर्षीच्या आयपीएलसाठी रविवारी हैद्राबादमध्ये आगमन झाले आहे. हैद्राबादमध्ये येताच त्याने सनरायझर्स हैद्राबाद संघाबरोबर सरावसही धमाकेदार सुरुवात केली आहे.

रविवारी सनरायझर्स हैद्राबाद संघाने अ आणि ब असे संघ तयार करत सराव सामना खेळवला होता. या सामन्यात वॉर्नरने अ संघाकडून खेळताना 43 चेंडूत 65 धावांची अर्धशतकी खेळी केली. तो 12 व्या षटकात बाद झाला.

त्याच्याबरोबरच अ संघाकडून मनिष पांडेने 43 चेंडूत नाबाद 67 धावा आणि दीपक हुडाने 27 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. या तिघांच्या खेळीमुळे सनरायझर्स अ संघाने 20 षटकात 2 बाद 212 धावा करत सनरायझर्स ब संघाला विजयासाठी 213 धावांचे आव्हान दिले.

हे आव्हान ब संघाने रिकी भूई आणि युसुफ पठाणच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या जोरावर 18.1 षटकातच पूर्ण केले.

वॉर्नरने आयपीएलमध्ये 1 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. मागीलवर्षी चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्यावर एक वर्षाची बंदी घातली होती. त्यामुळे आयपीएलमध्येही सहभागी होण्यास बीसीसीआयने वॉर्नरला नकार दिला. पण आता तो यावर्षी पून्हा आयपीएममध्ये खेळण्यास सज्ज झाला आहे.

त्याने याबद्दल ट्विट करुन त्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. वॉर्नरने म्हटले आहे की ‘सनरायझर्स हैद्राबाद संघात परत येऊन चांगले वाटत आहे. मागील 12 महिन्यांपासून संघाने आणि चाहत्यांनी दिलेल्या प्रमाणिक पाठिंब्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. आता पुनरागमन करण्याची वेळ आहे.’

महत्त्वाच्या बातम्या-

पृथ्वी शाॅचा मोठा खुलासा, कोहली-शास्त्री असे वागले ड्रेसिंगरुममध्ये

आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारे टाॅप ५ खेळाडू

बरोबर ७ वर्षापुर्वी याच दिवशी सचिनने घेतला होता मोठा निर्णय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment