सनरायझर्स हैदराबाद संघाने मंगळवारी (३ नोव्हेंबर) मुंबई इंडियन्सला १० विकेट्सने पराभवाची धूळ चारली. या विजयासह त्यांनी प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री केली. मुंबईने दिलेल्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून कर्णधार डेविड वॉर्नरने उल्लेखनीय खेळी केली. यासह त्याने सलग सहाव्या हंगामात ५०० धावांचा टप्पा पूर्ण करण्याचा कारनामा केला.
आयपीएल २०२०मध्ये ५०० धावांचा टप्पा केला पूर्ण
वॉर्नरने मुंबईविरुद्ध खेळताना ५८ चेंडूत ८५ धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. या धावा करताना त्याने १ षटकार आणि १० चौकार ठोकले. या खेळीसह त्याने आयपीएल २०२० मध्ये हैदराबादकडून खेळताना ५०० धावांचा टप्पा पार केला. त्याने या हंगामात एकूण ५२९ धावा केल्या आहेत.
मागील ५ हंगामातही केला होता ५०० धावांचा टप्पा पूर्ण
अशीच कामगिरी त्याने हैदराबादसाठी मागील पाच हंगामातही केली आहे. त्याने २०१४ च्या आपल्या पहिल्या हंगामात ५२८ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने २०१५मध्ये ५६२ धावा, २०१६ मध्ये ८४८ धावा, २०१७ मध्ये ६४१ धावा आणि २०१९ मध्ये ६९२ धावा केल्या होत्या.
फक्त त्याला २०१८ या हंगामात खेळता आले नव्हते. त्याच्यावर चेंडू छेडछाडीमुळे १ वर्षासाठी बंदी घातली होती.
वॉर्नरने आयपीएलमध्ये प्रत्येक हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघासाठी केलेल्या धावा
५२८ धावा- २०१४
५६२ धावा- २०१५
८४८ धावा- २०१६
६४१ धावा- २०१७
६९२ धावा- २०१९
५२९* धावा- २०२०
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबईला पराभवाची धूळ चारत हैदराबाद प्लेऑफमध्ये दाखल, वॉर्नर आणि साहा यांची अर्धशतके
-IPL: ‘मागील ३ सामन्यात…’, कोलकाताविरुद्ध सामना गमावल्यानंतर डेविड वॉर्नरचे मोठे वक्तव्य
-“…म्हणून मी समदला गोलंदाजी दिली”, शेवटचे षटक फिरकीपटूला दिल्याबद्दल डेविड वॉर्नरचे स्पष्टीकरण
-दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर विलियम्सन, रशीद नाही तर ‘या’ भारतीयाचे डेविड वॉर्नरने केले कौतुक
ट्रेंडिंग लेख-
-‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
-IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?