---Advertisement---

‘मी आणि यजुवेंद्र चहल दशकातील सर्वोत्तम टिकटॉकर’, डेव्हिड वॉर्नरची मजेशीर पोस्ट

---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा स्टार बॅट्समन डेव्हिड वॉर्नर आपल्या सोशल मीडियावरील व्हिडिओ साठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. वॉर्नरने लॉकडाउन मधील फावल्या वेळात टिक टॉक वर अनेक विनोदी व्हिडिओ बनवले असून, त्याच्या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असे. टिक टॉक वर बंदी आल्यानंतर त्याने इन्स्टाग्राम द्वारे आपले मजेशीर व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली. त्याच्या या व्हिडिओंना देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे .

वॉर्नर, हॉलीवुड व बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांच्या व्हिडिओंना स्वतःचा चेहरा लावून ते पोस्ट करत असतो. नुकताच त्याने विराट कोहलीला दशकातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर, विराटच्या व्हिडिओला स्वतःचा चेहरा लावत व्हिडिओ पोस्ट केला होता. यादरम्यान वॉर्नरने आपल्या इंस्टाग्राम पोस्टवरून स्वतःला आणि यजुवेंद्र चहलला दशकातील सर्वोत्तम टिकटॉकर घोषित केले आहे.

वॉर्नरने आपल्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये लिहिले आहे की, ‘तुमच्या सर्वांच्या सहकार्यासाठी शुभेच्छा. माझ्यामते यजुवेंद्र चहल आणि मी या पुरस्कारासाठी योग्य आहोत.’ वॉर्नरने आपल्या पोस्टमध्ये आयसीसीच्या अवॉर्ड मधील फोटोला मजेशीर रित्या एडिट केले आहे. वॉर्नरने हा फोटो पोस्ट केल्यानंतर, काही कालावधीतच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/p/CJZ6Jf6LivX/?utm_source=ig_embed

वॉर्नर सध्या भारताविरुद्धच्या वन-डे मालिकेदरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरत आहे. या दुखापतीमुळे तो टी २० मालिकेत तसेच कसोटी मालिकेतील सुरूवातीच्या दोन सामन्यात खेळला नव्हता. मात्र तिसऱ्या सामन्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन संघाला आशा असेल की वॉर्नर दुखापतीतून सावरून तिसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करेल. ४ सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे ७ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:
– डेविड वॉर्नरचे पुनरागमन! असा आहे भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ
– अटीतटीच्या बॉक्सिंग डे कसोटीत न्यूझीलंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
काश्मीरमधील लोकांवर अत्याचार होतोय, पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचे वादग्रस्त विधान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---