---Advertisement---

पत्नी आणि मुलींनी मांडला क्रिकेटचा डाव अन् वॉर्नर झाला कॉमेंट्रेटर, पाहा भन्नाट व्हिडिओ

On: रविवार, फेब्रुवारी 28, 2021 10:45 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सोशल मिडीयावर कायमच चर्चेत असतो. त्याच्या अंतरंगी व्हिडिओंसह तो नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करतांना दिसून आला आहे. विशेष म्हणजे भारतीय चित्रपटाशी संबंधित त्याचे व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरलेले पाहायला मिळतात. यावेळी देखील अशाच एका कारणाने वॉर्नर चर्चेत आला आहे. मात्र चर्चेचे कारण तो नसून, त्याची पत्नी आणि मुली आहेत.

मुली खेळतायेत क्रिकेट, वॉर्नर करतोय कॉमेंट्री

डेव्हिड वॉर्नरने नुकत्याच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत डेव्हिड वॉर्नरच्या मुली आणि वॉर्नरची पत्नी कँडिस हे त्यांच्या घराच्या मागील अंगणात क्रिकेट खेळतांना दिसून येत आहेत. यात वॉर्नरची पत्नी त्यांची मोठी मुलगी इंडी गोलंदाजी करत आहे. वॉर्नर या खेळाचा आनंद घेत कॉमेंट्री देखील करत आहे.

वॉर्नरने हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करताना त्याला खास कॅप्शन देखील दिले आहे. “घराच्या मागील अंगणातील पिच प्रॅक्टिस करण्यासाठी फार काही वाईट नाही. मुली चांगली प्रॅक्टिस करत आहेत”, असे त्याने या कॅप्शनमध्ये म्हंटले आहे.

https://www.instagram.com/p/CLynO2NlPQQ/?utm_source=ig_web_copy_link

वॉर्नरने शेअर केलेला हा व्हिडिओ तुफान लोकप्रिय होतो आहे. तसेच या व्हिडिओवर चाहत्यांच्या देखील भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. वॉर्नरच्या मुलीला फलंदाजी करतांना पाहून एका चाहत्याने तर “भविष्यातील ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाच्या सदस्याला शुभेच्छा” अशी गमतीशीर कमेंट केली आहे.

दरम्यान, डेव्हिड वॉर्नर बाबत बोलायचे झाल्यास गेले काही महिने तो ग्रॉइनच्या दुखापतीशी झुंजतो आहे. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याला क्षेत्ररक्षण करतांना त्याला ही दुखापत झाली होती. त्यानंतर तो टी-२० मालिकेलाही मुकला होता. त्यानंतर वॉर्नरने कसोटी मालिकेत पुनरागमन केले, मात्र तो १०० टक्के फिट नसल्याचे मैदानावर जाणवत होते. त्यामुळे आता वॉर्नरचे लक्ष्य या दुखापतीतून सावरून लवकरात लवकर पूर्णपणे तंदुरुस्त होण्याचे असेल.

महत्वाच्या बातम्या:

अरे बापरे! एवढा खतरनाक फुलटॉस, चेंडू टप्पा न घेता हवेतून सरळ बाउंड्रीपार; पाहा थरारक व्हिडिओ

पुणेकर क्रिकेटप्रेमींसाठी आहे ही बॅड न्यूज! प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहाता येणार नाहीत वनडे सामने

एवढी प्रेमळ पत्नी असताना कोण कसं डिप्रेशनमध्ये जाईल; विराटच्या त्या भाष्यावर भारतीय दिग्गजाची प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---