एकीकडे भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळतो आहे. त्याचवेळी दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघही पाकिस्तान (Australia Tour Of Pakistan) दौऱ्यावर ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या मालिकेतील पहिला सामना (First Test) रावळपिंडी येथे सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमान पाकिस्तान संघाने ४७६ धावांवर डाव घोषित केला आहे. प्रत्युत्तरात पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने चौथ्या दिवसापर्यंत (०७ मार्च) ३५० पेक्षा जास्त धावा फलकावर लावल्या आहेत. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) हा जरा वेगळ्या अंदाजात दिसला.
वॉर्नरला नेहमी मैदानावर आक्रमक अंदाजात पाहिले गेले आहे. परंतु पाकिस्तानानत वॉर्नरचे वेगळेच रूप (David Warner’s Different Behaviour) पाहायला मिळाले. त्याला पाकिस्तानचे गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी, नसीम शाह यांनी पुन्हा- पुन्हा वॉर्नरला उकसवण्याचा प्रयत्न केला. परंतु वॉर्नरने दरवेळी त्यांना हसून उत्तर (Aggressive Warner Looks Silent In Pakistan) दिले.
पाकिस्तानी खेळाडूंनी वॉर्नरला उकसवण्याचा केला प्रयत्न
पाकिस्तानच्या ४७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि वॉर्नर सलामीला फलंदाजी करायला आले होते. यावेळी फलंदाजी करत असताना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीमचा एक चेंडू वॉर्नरच्या खांद्याला जाऊन लागला. त्यानंतर गोलंदाज नसीम वॉर्नरच्या जवळही (Pakistani Bowlers Try To Tease Warner) गेला. परंतु वॉर्नरने त्याला हसत उत्तर दिले आणि नसीमच्या खांद्यावर हातही ठेवला. तसेच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिनच्या स्विंग करणाऱ्या चेंडूवरही वॉर्नरने इशारा केल्याचे पाहायला मिळाले.
New David Warner, he is just smiling when Naseem came to show some aggression. pic.twitter.com/dP3hMl2kar
— Johns. (@CricCrazyJohns) March 6, 2022
Bowlers 🤝 Warner
All Cool #BoysReadyHain l #PAKvAUS pic.twitter.com/2XVOAhGJFW— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 6, 2022
अखेर साजिद खानने वॉर्नरला त्रिफळाचीत केले. वॉर्नर १२ चौकारांच्या मदतीने ६८ धावांवर खेळत होता. यावेळी डावातील ४१ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या फिरकीपटू साजिद खानने षटकातील चौथ्या चेंडूवर वॉर्नरला त्रिफळाचीत केले. साजिदचा फिरकी चेंडू वॉर्नरला समजला नाही आणि त्याची दांडी गुल झाली. तत्पूर्वी साजिदच्या षटकादरम्यान तो सातत्याने डोळ्यांनी इशारे करत वॉर्नरला छेडताना दिसला होता. शेवटी वॉर्नरची विकेट घेतल्यानंतरही त्याने विशेष पद्धतीने जल्लोष साजरा केला.
https://twitter.com/ShaziyaaMehmood/status/1500384961798578178?s=20&t=DrZmyEm-E5EvN1sXHyfIpw
पाकिस्तानकडून पहिल्या डावात २ फलंदाजांचे दीडशतक
दरम्यान पाकिस्तानकडून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर इमाम-उल-हक आणि अझहर अली यांनी दीडशतके केली. इमाम २ षटकार आणि १६ चौकारांच्या मदतीने १५७ धावा करू बाद झाला. तर अलीने ३ षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने १८५ धावांची खेळी केली. त्यांच्या मॅरेथॉन खेळीमुळे पाकिस्तानच्या संघाने ४७७ धावांचे भलेमोठे लक्ष्य ऑस्ट्रेलियापुढे ठेवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोहालीच्या मैदानावर नेहमीच खणखणीत वाजतं जडेजाचं नाणं, याच मैदानावर पूर्ण केलीय ‘अनोखी हॅट्रिक’
‘जडेजाला धावांची भूक, जे संघहिताचेच’, कर्णधार रोहितने कौतुकाने थोपटली पाठ