काही दिवसांपुर्वी आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी पंचांशी झालेल्या वाईड बॉल वादामुळे चर्चेत आला होता. कित्येक संतप्त चाहत्यांनी त्याच्या या वागणूकीवर टीकादेखील केली होती. १३ ऑक्टोबरला दुबई येथे सनरायझर्स हैदाराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात हे प्रकरण घडले होते. आता हैदाराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने मौन तोडत या प्रकरणावर भाष्य केले आहे.
वॉर्नर म्हणाला की, “मला माहित आहे की त्यादिवशी पंचांनी अंतिम षटकात अटीतटीच्या परिस्थितीवेळी वाईड बॉल दिल्यामुळे धोनी हताश झाला होता. पण खरं सांगायचं झालं तर, तो वाईड बॉल होता आणि पंचदेखील तो वाईड बॉल असल्याचे जाहीर करणार होते. पण धोनीच्या हावभावाकडे पाहिल्यानंतर त्यांनी त्यांचा निर्णय बदलला.”
“खरं तर, धोनीलाही माहिती होते की, तो वाईड बॉल होता. तो यष्टीमागे उभा राहून स्पष्टपणे हे पाहू शकत होता. एक कर्णधार म्हणून त्या परिस्थितीत मीही पंचांवर ओरडलो असतो आणि माझी निराशा व्यक्त केली असती. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की, पंचांनी स्वत: योग्य ते निर्णय घ्यावेत आणि आम्ही सर्वांनी त्या निर्णयांचा सन्मान करावा” असे शेवटी बोलताना वॉर्नरने म्हटले.
चेन्नई विरुद्ध हैदराबाद संघात झालेल्या त्या सामन्यात चेन्नईने २० धावांनी विजय मिळवला होता. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना हैदराबादला १६७ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात हैदराबादला केवळ १४७ धावाच करता आल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
“धोनी अंपायरचाही कर्णधार”, वाईडचा निर्णय रोखल्याने चाहत्यांनी साधला निशाणा
IPL 2020: चेन्नईविरुद्ध खणखणीत ३ षटकार ठोकत विजय मिळाल्यानंतर काय म्हणाला अक्षर पटेल?, घ्या जाणून
धवन नाही तर ‘या’ खेळाडूला देऊ सामनावीराचा पुरस्कार, श्रेयस अय्यरने दिली प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…