---Advertisement---

ऑस्ट्रेलियन खेळाडूने बांधली हार्दिकच्या बुटाची लेस, व्हिडिओ व्हायरल

On: शुक्रवार, नोव्हेंबर 27, 2020 7:03 PM
---Advertisement---

शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पहिला वनडे सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पार पडला. या सामन्यादरम्यान दोन्ही देशांच्या खेळाडूंकडून खिलाडूवृत्तीचे दर्शन झाले. या सामन्यातीलच खिलावृत्तीचे दर्शन देणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात डेविड वॉर्नर हार्दिक पंड्याच्या बुटाची लेस बांधत आहे.

झाले असे की ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ३२ व्या षटकात भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या बुटाची लेस सुटली. त्यामुळे तिथे उभा असलेल्या ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर वॉर्नरने पंड्याला त्याच्या बुटाची लेस बांधून दिली. यानंतर घाईने वॉर्नर दुसरीकडे जात असताना पंड्या त्याला धन्यवाद देताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पंड्याची अर्धशतकी खेळी – 

हार्दिक पंड्याने भारताकडून ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ९० धावांची झंझावाती खेळी केली. हार्दिकने ही ९० धावांची खेळी ७६ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह केली. त्याने शिखर धवनसह ५ व्या विकेटसाठी १२८ धावांची शतकी भागीदारीही रचली. शिखरने ७४ धावांची खेळी केली. पण या दोघांच्या अर्धशतकी खेळीनंतरही भारताला ५० षटकात ३०८ धावाच करता आल्याने ६६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार ऍरॉन फिंचने ११४ आणि स्टिव्ह स्मिथने १०५ धावांची शतकी खेळी केली. तर वॉर्नरने ६९ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ६ बाद ३७४ धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

सिडनीची साडेसाती संपेना! सिडनीच्या मैदानावर विराट पुन्हा अपयशी

अबब! स्टीव स्मिथचे भारताविरुद्धचे ‘हे’ आकडे तुम्हालाही करतील थक्क

IND vs AUS ODI : धवन आणि पांड्याची झुंज व्यर्थ, पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---