भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला. या सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना ६ बाद ३७४ धावांचा डोंगर उभारला. ज्यात कर्णधार ऍरोन फिंच आणि स्टीव स्मिथच्या शतकी खेळींचा समावेश होता.
स्टीव स्मिथचे हे भारताविरुद्धचे वनडे सामन्यांतील चौथे शतक होते. स्मिथने भारताविरुद्ध खेळलेल्या १६ डावांमध्ये ४ शतकांसह १२ वेळा ४० हून अधिक धावा काढल्या आहेत. विशेष म्हणजे या १६ डावांमध्ये स्मिथ केवळ दोनदा एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे.
स्टीव स्मिथच्या भारताविरुद्धच्या वनडे सामन्यांतील धावसंख्या
४७, १०५, १४९, ४६, ४१, ५१, २८, १, ५९, ६३, ३, १६, ६९, ९८, १३१, १०५
स्मिथला बाद करण्यासाठी आखावी लागेल विशेष योजना
स्टीव स्मिथचे भारताविरुद्धचे हे आकडे भारतीय संघाला नक्कीच धडकी भरवणारे आहेत. मालिकेच्या पाहिल्याच सामन्यातही त्याने शतक झळकावून त्याने आपण फॉर्मात परत येत असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाला स्मिथचा धावांचा ओघ थांबवण्यासाठी भक्कम योजना आखावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
IND vs AUS ODI : धवन आणि पांड्याची झुंज व्यर्थ, पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय