अॉस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वार्नर बॉल टेंम्परींग प्रकरणामुळे एक वर्षाच्या बंदीला सामोरे जात आहे. असे असले तरी इंग्लंड-अॉस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेत तो एक नवी भूमिका बजावताना दिसणार आहे.
इंग्लंड-अॉस्ट्रेलिया यांच्यात पाच एकदिवसीय सामन्यांची इंग्लंडमध्ये मालिका होत आहे.
13 जुनपासून सुरू होत असलेल्या इंग्लंड-अॉस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वार्नर चॅनल 9 या वाहिनीवर या सामन्याचे समालोचन करताना दिसेल. 19 जूनला इंग्लंड-अॉस्ट्रेलिया यांच्यामध्ये कार्डीफ येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे.
क्रिकेट.कॉम.एयू या संतकेस्थळाशी बोलताना चॅनेल 9 या वाहिनीचे संचालक टॉम मॅलोन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ” डेव्हिडला दक्षिन आफ्रिकेतील बॉल टेंम्परींग प्रकरणात खलनायक बनवण्यात आले. त्याच्याकडून चूक झाली असली तरी, माणूस म्हणून तो एक चांगला व्यक्ती आहे हे नक्की. कारण गेल्या पाच वर्षांपासून आमचे व्यावसायीक सबंध असल्याने मी त्याला जवळून ओळखतो.
त्याने गेल्या एक दशकापासून अॉस्ट्रेलियासाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी गेली आहे. मला आशा आहे की, त्याला क्रिकेट अॉस्ट्रेलिया येत्या काळात नक्कीचं संधी देईल.”
क्रिकेट अॉस्ट्रेलियाचा सेव्हन नेटवर्क आणि फॉक्स स्पोर्ट्स यांच्याशी प्रसारण करार असला तरी, 2015 आणि 2019 अॅशेस मालिका आणि सर्वप्रकारच्या मर्यादित सामन्यांच्या प्रसारण हक्क चॅनल 9 वाहिनीकडे आहेत.