जवळपास २ वर्षांपूर्वी क्रिकेट जगतात चेंडू छेडछाडीचे प्रकरण चांगलेच चर्चेचा विषय ठरले होते. जेव्हा ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. त्यादरम्यान तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरॉन बॅनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करताना सापडले होते. त्यामुळे स्मिथ आणि वॉर्नरवर एक वर्षाची, तर बॅनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती.
तपासणीनंतर असे समजले होते की या ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूंनी विजयाच्या भावनेने हे लाजीरवाणे कृत्य केले होते. खरंतर या मालिकेदरम्यान दोन्ही संघांमध्ये मैदान आणि मैदानाच्या बाहेर बरेच वाद झाले होते आणि याच दरम्यान डेव्हिड वॉर्नरची पत्नी कँडिसचे नाव घेण्यामुळे वाद वाढले होते.
दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू क्विंटन डी कॉकने वॉर्नरच्या पत्नीचा भूतकाळ सर्वांसमोर उघड केला होता. त्यामुळे वॉर्नर भडकला आणि त्याच्या मनात कोणत्याही परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याची भावना दाटून आली. डी कॉकने वॉर्नरसमोर रग्बी खेळाडूचे नाव घेतले होते. त्यानंतर वॉर्नरने आपले संतुलन गमावले.
खरंतर २००७मध्ये कँडिस आणि रग्बी खेळाडू सोनी बिल विलियम्समध्ये टॉयलेट प्रकरणाच्या घटनांनी जोर धरला होता. त्याला कँडिसच्या आयुष्यातील दाग म्हटले जाते. तरीही वॉर्नर आणि कँडिसने या घटनेचा विचार न करता आयुष्यात पुढे जाण्याचा विचार केला होता.
वॉर्नरनेही आपल्या लाजीरवाण्या कृत्यासाठी शिक्षा भोगली आणि त्यानंतर मैदानावर दमदार पुनरागमन केले.
ट्रेंडिंग घडामोडी-
-जेव्हा दीपिका पादुकोणला पाहुन लाजले होते धोनी- युवी…
-हसीन जहाँने शेअर केलेल्या वर्कआऊट व्हिडिओवर चाहत्यांनी दिल्या शिव्या
-रोहित शर्मावर दाखवला विश्वास; केले टी२०चे कर्णधार, विराटही आहे संघात