ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबत मोठी घोषणा केली. तसेच आगामी ऑस्ट्रेलियन उन्हाळ्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे ऑस्ट्रेलियन खेळाडूने म्हटले आहे. सध्या वॉर्नर भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अंतिम जागतिक कसोटी अजिंक्यपदाची तयारी करत आहे. तर जाणून घेऊ की, वॉर्नर किती सामने खेळणार आहे.
माध्यमांशी बोलताना वॉर्नर (Australia’s legendary cricketer David Warner) म्हणाला की, “तो इंग्लंडसोबत पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेत खेळताना दिसू शकतो. तसेच, वर्षांच्या शेवटी भारतामध्ये आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वकप (Cricket World Cup) खेळताना चाहत्यांना दिसेन.” 36 वर्षीय क्रिकेटपटूने खुलासा केला की, “जानेवारी 2024 मध्ये सिडनी येथे घरच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळून त्याला आपल्या कसोटी कारकिर्दीतुन निवृत्ती घ्यायची आहे.”
कसोटी निवृत्ती बद्दल घोषणा
वॉर्नरने आपल्या कसोटी निवृत्ती बद्दल (announced his retirement from cricket) सांगितले की, “धावा बनवायच्या आहेत… मी कायमच म्हणत आलो आहे की, 2024 मधील टी20 विश्वचषक (T20 World Cup) सामना कदाचित माझा अंतिम सामना असेल. जर मी जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि आगामी अॅशेस मालिकामध्ये खेळू शकलो, तर अॅशेस मालिकेनंतर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत मी नक्कीच शेवटच्या वेळी खेळेन.
कसोटीमधील आत्तापर्यंतची कामगिरी
वॉर्नरने आत्तापर्यंत 102 कसोटी सामन्यांमध्ये 8158 धावा बनविल्या आहेत. तसेच, त्याच्या नावी कसोटीमधील 3 द्विशतके, 25 शतके आणि 34 अर्धशतके आहेत. आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 335 आहे. भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानसह अनेक मोठ्या संघांविरुद्ध चमकदार कामगिरी करण्यात तो यशस्वी ठरला आहे.
सामन्याआधी दुखापत बरी व्हावी
वॉर्नरने पुढे सांगितले की, या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यावेळी डाव्या कोपऱ्याला फ्रॅक्चर झाले होते. या दुखापतीमुळे तो अंतिम दोन कसोटी सामन्यांना मुकला होता. तसेच गुरुवारी त्याच्यावर फिजिओथेरपिस्टकडून उपचार झाले पण बुधवारच्या ओव्हलवर होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (World Test Championship) अंतिमसामन्यासाठी तो तंदुरुस्त होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
अत्यंत धक्कादायक! चेन्नईने ट्रॉफी जिंकताच त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली, महाराष्ट्रातील भयंकर घटना
‘…तिथे त्याची खूप पूजा केली जाते’, डेवॉन कॉनवेकडून धोनीवर कौतुकाचा पाऊस