मुंबई । आयर्लंड आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जात आहे. गुरुवारी 30जुलै रोजी साऊथॅम्प्टन येथे मालिकेचा पहिला सामना खेळला गेला. इंग्लंडने सहा गडी राखून विजय मिळविला. कोविड 19 साथीच्या दरम्यान हा पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना होता. या मालिकेसह आयसीसी वर्ल्डकप सुपर लीगलाही सुरुवात झाली.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीची संधी दिली. डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलेने जबरदस्त गोलंदाजी केली आणि 30 धावांत पाच बळी घेतले. आयर्लंडचा संघ 44.4 षटकांत 172 धावांवर सर्वबाद झाला होता, प्रत्युत्तरात इंग्लंडने 27.5 षटकांत चार गड्याच्या मोबदल्यात 174 धावा करत सामना जिंकला.
आयर्लंडविरुद्ध डेव्हिड विलेने 8.4 षटकांत अवघ्या 30 धावांच्या मोबदल्यात अर्धा संघ बाद केला. विलीच्या गोलंदाजीची सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्याने 52 पैकी 35 चेंडूंत एकही धाव दिला नाही. म्हणजे त्याने 35 चेंडू निर्धाव (डॉट बॉल) फेकले.
विलीने पहिल्याच षटकात आयर्लंडला धक्का देण्यास सुरुवात केली होती. त्याने चौथ्या चेंडूवर आयरिश सलामीवीर पॉल स्टर्लिंगला पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला. यानंतर आयर्लंडने 7 व्या षटकांपर्यंत 5 गडी गमावले. त्यातील विलीने 4 गडी बाद केले होते.
विलीने आयर्लंडविरुद्ध पाच विकेट्स घेत विशेष विक्रम केला आहे. वनडे सामन्यात पाच बळी घेणारा इंग्लंडचा तो पहिला डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याच्यापूर्वी ऍशले जाइल्स आणि समित पटेल यांनी हा पराक्रम केला होता, पण हे दोघेही फिरकीपटू होते.
विश्वचषक 2019 मध्ये डेव्हिड विलीला संधी दिली गेली नव्हती. जोफ्रा आर्चरमुळे त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. विश्वचषकानंतर तो पहिल्यांदाच मालिका खेळत आहे. यात त्याने स्वतःला सिद्ध करत पाच गडी टिपले.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेट फॅनने विचारले तुझे वय काय? शाहिद आफ्रिदीने दिले ‘हे’ उत्तर
इंग्लंडला विश्वविजेतेपद जिंकण्यासाठी आयपीएलची झाली अशी मदत, मॉर्गनने केला खुलासा
भारतीय माजी क्रिकेटपटू झाला कोच, थेट कॅरेबियन लीगमध्ये करणार मार्गदर्शन
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: असे ३ परदेशी खेळाडू, ज्यांचा फॉर्म ठरेल त्यांच्या संघासाठी सर्वाधिक फायद्याचा
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ७- हेडनची पर्थच्या मैदानावर कसोटीतील वनडे स्टाईल फटकेबाजी
आपल्या देशासाठी जखम झालेलं स्वत:चं बोट कापायलाही तयार झालेला क्रिकेटर