इंग्लंडचा खेळाडू डेव्हिड विले कोरोना व्हायरस चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. विले आणि आयसीसीने ट्विटद्वारे याची पुष्टी केली. विले टी२० ब्लास्टमध्ये यॉर्कशायरच्या संघाकडून खेळत होता, पण कोविड-१९ पॉझिटिव्ह सापडल्यानंतर आता तो यापुढील उर्वरित सामने खेळणार नाही. तो तीन सामन्यांसाठी बाहेर झाला आहे. स्वत: विलेनी ट्वीट केले की कोरोना व्हायरस चाचणीत तो आणि पत्नी पॉझिटिव्ह आले आहे.
डेव्हिड विलेनी ट्विट केले आणि लिहिले- ‘सर्व संदेशाबद्दल धन्यवाद. मी आणि माझी पत्नी कोविड १९ चाचणीत पॉझिटिव्हला आलो आहोत. टी२० ब्लास्टच्या उर्वरित सामन्यांना मी मिस करेल, सर्वात वाईट म्हणजे, तिन खेळाडू आमच्या संपर्कात आले होते, त्यामुळे त्यांनाही धोका आहे.’
Thank you for all the kind messages. My wife & I received positive COVID test results. Gutted to be missing the remaining games. Even more devastated that having been in contact with the other 3 lads Sat morning (before we had symptoms) means they’re at risk & unavailable too. https://t.co/mP1pZAiX1C
— David Willey (@david_willey) September 16, 2020
यासह, डेव्हिड विलेच्या संपर्कात आलेल्या सर्व खेळाडूंना खबरदारी म्हणून १४ दिवसांसाठी वेगळं ठेवण्यात आले आहे. विले व्यतिरिक्त, यॉर्कशायर संघातील आणखी 3 खेळाडू, टॉम कोहलर, जोश पॉसडेन आणि मॅथ्यू फिशर हे धोका लक्षात घेऊन, टी२० ब्लास्टचे काही सामने खेळणार नाहीत.
यापूर्वी, यॉर्कशायरने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत चार खेळाडूंच्या बाहेर जाण्याविषयी माहिती दिली होती.
YCCC can confirm that Matthew Fisher, Tom Kohler-Cadmore, Josh Poysden and David Willey will be unavailable for the remaining Vitality Blast group matches after a positive COVID test was received #OneRose
— Yorkshire CCC (@YorkshireCCC) September 16, 2020
गेल्या वर्षी विश्वचषक संघातून वगळलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलेने जुलै २०२० मध्ये आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात पाच विकेट्स घेऊन संघात स्थान निश्चित केले. पण तो म्हणाला की, अजून सर्वोत्कृष्ट खेळ बाकी आहे. गेल्या वर्षी विश्वचषक संघात विलेची निवड झाली नव्हती. त्याच्याऐवजी जोफ्रा आर्चरला प्राधान्य देण्यात आले होते.
त्याचवेळी, डेव्हिड विलेला जेसन रॉयच्या जागी संघात खेळण्याची संधी मिळाली होती, परंतु विलीने ही ऑफर नाकारली. यॉर्कशायर संघासाठी टी२० ब्लास्ट स्पर्धा खेळायची आहे, असे सांगत विलेने ही ऑफर नाकारली होती.