---Advertisement---

मलानचा विश्वविक्रम! ६५ वी धाव घेताच कोहली, बाबर आझमला टाकले मागे

On: शनिवार, मार्च 20, 2021 10:37 PM
---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शनिवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाचवा टी२० सामना झाला. या सामन्यात भारताने इंग्लंडला २२५ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलानने अर्धशतक केले. यासह त्याने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

मलानने या सामन्या ४६ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा केल्या. यासह त्याने त्याच्या कारकिर्दीत १००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याच्या आता २४ आंतरराष्ट्रीय टी२० डावात १००३ धावा झाल्या आहेत. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

त्याने हा विश्वविक्रम करताना बाबर आझम, विराट कोहलीला मागे टाकले आहे. बाबर आझमने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २६ तर विराटने २७ डावात १००० धावा पूर्ण केल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात जलद १००० धावा करणारे फलंदाज –
२४ डाव – डेव्हिड मलान
२६ डाव – बाबर आझम
२७ डाव – विराट कोहली
२९ डाव – केएल राहुल
२९ डाव – ऍरॉन फिंच

भारताच्या २२४ धावा 

पाचव्या टी२० सामन्यात भारताकडून रोहित शर्माने ६४ आणि विराट कोहलीने नाबाद ८० धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच सुर्यकुमार यादवने ३२ आणि हार्दिक पंड्याने ३९ धावांची आक्रमक खेळी केली. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २ बाद २२४ धावा करता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

आशिया खंडात डंका वाजवलेल्या दिग्गज फलंदाजांच्या ‘या’ खास यादीत आता विराटचाही समावेश

रोहित शर्माने अर्धशतक तर झळकावलेच पण या मानाच्या यादीतही पटकावले दुसरे स्थान

‘सलामीवीर’ विराट! आत्तापर्यंत सलामीला फलंदाजी करताना अशी आहे कोहलीची कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---