---Advertisement---

आजपासून हे स्टेडियम भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम नावाने ओळखले जाणार

---Advertisement---

भारत विरुद्ध विंडीज संघात आज लखनऊमध्ये दुसरा टी20 सामना होणार आहे. पण हा सामना ज्या मैदानावर होणार आहे त्या एकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमचे नाव उत्तर प्रदेशच्या सरकारने बदलले असून आता हे मैदान ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम’ नावाने ओळखले जाईल.

उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाइक यांनी सरकारच्या या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. सोमवारी गृहनिर्माण व शहरी नियोजन विभागाचे मुख्य सचिव नितीन रमेश गोकरन यांनी स्टेडीयमचे नाव बदलण्याचे आदेश दिले.

लखनऊ डेवलेपमेंट अथोरिटीने दिलेल्या माहितीप्रमाणे एकाना स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमीटेड, जीसी कंट्रक्शन आणि डेव्हलपमेंट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमीटेडमध्ये झालेल्या करारनुसार मैदानाचे नाव संपुर्ण काम झाल्यावर बदलण्यात येणार होते.

उत्तरप्रदेश सरकारने याच नियमाचा आधार घेत मैदानाचे नाव बदलले. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे याच वर्षी आॅगस्ट महिन्यात निधन झाले होते.

यापुर्वीही भारतातील अनेक मैदानांना माजी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची नावे देण्यात आली आहेत.

या स्टेडीयमवर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 सामना आयोजीत करणारे हे जगातील एकूण 102 वे तर भारतातील 22 वे मैदान आहे. या मैदानाची एकूण 50 हजार प्रेक्षक बैठकीची क्षमता आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

सचिनप्रमाणेच विराटलाही भारतरत्न द्या, पहा कुणी केली मागणी

आज होत असलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात या ५ विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा

या कारणामुळे आजचा दिवस रोहित शर्माच्या कारकिर्दीत सुवर्णाक्षरांनी लिहीला जाणार

२०००सालापुर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले ६ खेळाडू आजही खेळतात क्रिकेट

५ वर्षांपुर्वी हाच दिवस होता सचिन- रोहितसाठी कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा क्षण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment