राजकोट कसोटीत शनिवारी म्हणजे सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एकूण 10 विकेट्स पडल्या. दिवसाखेर भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावात 2 विकेट्सच्या नुकसानावर 196 धावा केल्या आहेत. पहिल्या डावानंतर भारताकडे 126 धावांची आघाडी होती. तिसऱ्या दिवसाखेर ही आघाडी 322 धावांपर्यंत पोहोचली. यशस्वी जयस्वाल याचे शतक तर शुबमन गिल याचे अर्धशतक शनिवारी शेवटच्या सत्रात चाहत्यांना पाहायला मिळाले.
राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात बेन डकेट (133*) आणि जो रुट (9*) यांनी केली. दिवसाच्या सुरुवातील इंग्लंडची धावसंख्या 2 विकेट्सच्या नुकसानावर 207 धावा होती. शनिवारी दुपारच्या जेवणानंतर इंग्लंड संघाचा पहिला डाव संपला. पाहुण्यांनी 71.1 षटकात 319 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. त्यानंतर भारतीय संघ पुन्हा फलंदाजीला आला. संघाची धावसंख्या 30 असताना कर्णधार रोहित शर्मा याने वैयक्तिक 19 धावांवर विकेट गमावली.
पण त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल यांच्यात 155* धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी अजून मोठी होऊ शकत होती. पण पाठीत वेदना होत असल्याने जयस्वाल रिटाडर्ड हर्ट झाला. त्यावेळी भारताची धावसंख्या 185 धावा होती. पण दुसरीकडे शुबमन गिल दिवसाखेर 65* धावा करून खेळपट्टीवर कायम आहे. जरत पाटीदार 10 चेंडू खेळून शुन्यावर बाद झाला. कुलदीप यादव याला ‘नाईट वॉचमन’ म्हणून दिवसाखेर पाठवले गेले. कुलदीपने नाबाद 3 धावांची खेळी केली आहे.
दुसऱ्या दिवशी भारतासाठी मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली होती. अश्विन कौंटुंबिक कारणास्तव राजकोट कसोटी अर्ध्यात सोडून घरी परतला आहे. पण अश्विनच्या अनुपस्थितीत भारतासाठी इतर गोलंदाजांनी भेदक प्रदर्शन केले. तिसऱ्या दिवशी मोहम्मद सिराजने तीन विकेट्स घेत डावातील आपल्या विकेट्सची संख्या 4 केली. जसप्रीत बुमराह याला एकाच विकेटवर समाधान मानावे लागले. कुलदीप यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स नावावर केल्या.
भारताच्या दुसऱ्या डावात इंग्लंडसाठी जो रुट आणि मार्क वुड यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन – बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.
(Day Three stumps of Rajkot test India lead by 322 runs with 8 wickets)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
यशस्वी जयस्वालची नाद खेळी! मागच्या सामन्यातील द्विशतकानंतर शनिवारी सलामीवीराचे वादळी शतक
मोहम्मद हाफीजची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला धमकी, म्हणाला ‘मी सर्वांना उघडे पाडेन…






