---Advertisement---

धावांचा पाऊस पाडणाऱ्या हैद्राबादला दिल्लीच्या ‘या’ 22 वर्षीय पठ्ठ्याने चोप चोप चोपले ! रचला मोठा विक्रम

Jake Fraser-McGurk
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात शनिवारी (दि. 20) सामना झाला. धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यात चौकार – षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. ट्रेविस हेडपासून सुरु झालेल्या वादळी खेळीचा अंत थेट दिल्लीच्या शेवटच्या फलंदाजापर्यंत सुरु होता. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या सामन्यात दिल्लीचा 67 धावांनी पराभव झाला. परंतू दिल्लीच्या एका युवा खेळाडूने मात्र सनरायझर्स हैद्राबादच्या खेळाडूंचे तोंडचे पाणी पळवले होते.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून दिल्ली कॅपिटल्सचा युवा फलंदाज 22 वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्क हाच ( JAKE FRASER-MCGURK ) आहे. जॅकच्या वादळी खेळीने काहीकाळ मैदानावर दिल्ली बाजी मारेल, असे चित्र निर्माण झाले होते. इतकेच नाही तर जॅकने दिल्लीकडून आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक साकारून आपली दिशा स्पष्ट केलीये. त्याच्याच जोरावर दिल्लीने 10 षटकांत 138 धावांपर्यंत मजल मारली होती. ( DC vs SRH IPL 2024 Jake Fraser-McGurk hits joint third fastest IPL fifty )

आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक (Fastest fifties in IPL)
13 चेंडू – जयस्वाल वि. कोलकाता (2023)
14 चेंडू – केएल राहुल वि. दिल्ली (2018)
14 चेंडू – कमिन्स वि. मुंबई (2022)
15 चेंडू – युसूफ पठाण वि. हैद्राबाद (2014)
15b – सुनिल नरायन वि. बंगळुरु (2017)
15b – पूरन वि. बंगळुरू (2023)
15b – जॅक फ्रेझर-मॅकगर्क वि. हैद्राबाद (2024)*

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---