---Advertisement---

IPL 2020 : ‘गब्बर’चे वादळी शतक, थरारक सामन्यात दिल्लीकडून चेन्नईचा ५ विकेट्सने पराभव

On: रविवार, ऑक्टोबर 18, 2020 8:15 AM
---Advertisement---

शनिवारी (१७ ऑक्टोबर) फलंदाजांच नंदनवन असलेल्या शारजाहच्या मैदानावर आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा ३४ वा सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी आसुसलेल्या चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्सने पराभूत केले आणि पुन्हा गुणतालिकेत अव्वल क्रमांकवर ताबा मिळवला.

नाणेफेक जिंकत चेन्नईने प्रथम फलंदाजी निवडली आणि २० षटकात ४ बाद १७९ धावा केल्या. चेन्नईच्या या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने ५ विकेट्सच्या बदल्यात १९.५ षटकात १८५ धावा केल्या आणि हंगामातील ७ वा विजय नोंदवला.

दिल्लीकडून फलंदाजी करताना गब्बर नावाने प्रसिद्ध असलेल्या शिखर धवनने शतकी खेळी केली. सलामीला फलंदाजीला येत त्याने केवळ ५८ चेंडूत हा पराक्रम केला. यात त्याच्या १४ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. तसेच अक्षर पटेलनेही (२१ धावा) ८व्या क्रमांकावर फलंदाजीला येत शेवटपर्यंत धवनची साथ दिली. धवनव्यतिरिक्त दिल्लीच्या इतर फलंदाजांना जास्त चांगले फलंदाजी प्रदर्शन करता आले नाही.

चेन्नईकडून गोलंदाजी करताना दिपक चाहरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. ४ षटकात केवळ १८ धावा देत त्याने हा कारनामा केला. त्याच्याव्यतिरिक्त सॅम करन, शार्दुल ठाकुर आणि ड्वेन ब्रावोनेही प्रत्येकी १ विकेट घेतली. पण सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना चेन्नईच्या खेळाडूंनी ३ झेल सोडले.

त्तपुर्वी चेन्नईकडून प्रथम फलंदाजी करताना फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक ५८ धावा केल्या. ४७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकार ठोकत त्याने ही धावसंख्या गाठली. तर अंबाती राडयूनेही २५ चेंडूत ४५ धावांचे योगदान दिले होते. या दोघांशिवाय शेन वॉटसन (३६) आणि रविंद्र जडेजानेही (३३) धावा केल्या.

दिल्लीकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज एन्रीक नॉर्किएने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर तुषार देशपांडेनेही सॅम करन व कागिसो रबाडाने फाफ डू प्लेसिसला बाद केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठ-मोठ्या गोलंदाजांची चिरफाड करणारा संजू सॅमसन ‘या’ गोलंदाजापुढे होतो गपगार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---