---Advertisement---

ठरलं तर! ‘या’ तारखेपासून भारतात होणार देशांतर्गत क्रिकेटला सुरुवात; गांगुलीची घोषणा

On: शनिवार, ऑक्टोबर 17, 2020 11:01 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने १ जानेवारीपासून देशांतर्गत क्रिकेटला सुरुवात होणार असल्याचे शनिवारी (१७ ऑक्टोबर) सांगितले. बीसीसीआयच्या शीर्ष परिषदेच्या बैठकीत बराच वेळ कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे बिघडलेल्या देशांतर्गत क्रिकेटच्या वेळापत्रकाविषयी चर्चा करण्यात आली.

गांगुली म्हणाला, “आम्ही देशांतर्गत क्रिकेटबद्दल बराच वेळ चर्चा केली. सोबतच आम्ही १ जानेवारी २०२१ पासून स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.” हंगाम लहान असेल का याबद्दल विचारले असता गांगुली म्हणाला की, बोर्ड सर्व देशांतर्गत स्पर्धांचे आयोजन करू शकणार नाही.

गांगुलीने संकेत दिले की, बीसीसीआय रणजी ट्रॉफीसाठी जानेवारी ते मार्च यादरम्यान विंंडोवर नजर ठेवून आहे. तो म्हणाला, “आम्ही निश्चितच रणजी ट्रॉफीच्या पूर्ण हंगामाचे आयोजन करू. परंतु सर्व स्पर्धांचे आयोजन करणे कदाचित शक्य होणार नाही.”

ज्यूनियर क्रिकेट आणि महिला स्पर्धांचे आयोजन मार्च आणि एप्रिल यादरम्यान केले जाईल, असेही गांगुली म्हणाला.

महिला क्रिकेटबद्दल बोलताना तो म्हणाला की, “वयोगटातील क्रिकेट आणि महिला क्रिकेटसाठी आमच्याकडे सविस्तर योजना आहेत. आम्ही रणजी ट्रॉफीपासून सुरुवात करू आणि त्यानंतर मार्च आणि एप्रिल दरम्यान आम्ही इतर स्पर्धांचे आयोजन करू.”

महत्त्वाच्या बातम्या-

-आयपीएलची तयारी पाहून सौरव गांगुली खूश; चक्क स्टेडियमवर जाऊन…

-सौरव गांगुलीला कठिण काळात प्रणव मुखर्जींनी दिले होते समर्थन; म्हणाले होते…

-चंदीगडच्या काशवीला आला बीसीसीआयचा फोन, गाजवणार शारजाह मैदान

ट्रेंडिंग लेख-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’

दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…

आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---