---Advertisement---

DC vs RCB: पहिल्या डावानंतर चित्र स्पष्ट; दोन्ही संघांसाठी क्वालिफायचं समीकरण अखेर ठरलं!

On: सोमवार, नोव्हेंबर 2, 2020 9:23 PM
---Advertisement---

आयपीएलच्या १३व्या हंगामातील ५५वा सामना रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सुरु आहे. यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाने ७ बाद १५२ धावा केल्या. यात देवदत्त पडिक्कलने ५० तर एबी डिविलियर्सने ३५ धावा केल्या. यामुळे नेट रनरेटची समिकरणं स्पष्ट झाली आहेत.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत होऊनही जर कोलकाता नाईट रायडर्सपेक्षा जास्त रनरेट राखायचा असेल तर त्यांना कमीत कमी १३४ धावा कराव्या लागतील. दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघालाही कमीत कमी १७.३ षटकांत दिल्लीला लक्ष्यापासून दूर ठेवावे लागणार आहे. जर बेंगलोर संघ या सामन्यात पराभूत झाला व त्यांनी दिल्लीला लक्ष १७.३ षटकांत पार करु दिले नाही तर त्यांचा रनरेट कोलकाता नाईट रायडर्सपेक्षा जास्त राहणार आहे.

सध्या बेंगलोर किंवा दिल्ली संघाला या स्पर्धेत पराभूत होऊनही प्ले ऑफमध्ये जायचे असेल तर या गोष्टी पुर्ण कराव्या लागणार आहेत. अशावेळी मुंबई व हैदराबाद संघातील सामन्यात जरी हैदराबाद जिंकले तरी प्ले ऑफमधून रॉयल चॅलेंजर बेंगलोर व दिल्ली कॅपिटल्स संघ स्पर्धेतून बाहेर पडणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---